Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Budget 7 Seater Cars : फॅमिली कार शोधताय? तर ‘या’ आहेत 11 लाखांच्या बजेटमधील उत्तम 7 सीटर कार, महिंद्रापासून टोयोटापर्यंतच्या कारचा समावेश…

११ लाखांच्या बजेटमध्ये फॅमिली कार खरेदी करायची असेल तर बाजारात महिंद्रापासून टोयोटापर्यंतच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या कारला बाजारात मागणी देखील प्रचंड आहे.

0

Budget 7 Seater Cars : ऑटो बाजारात कार खरेदीसाठी गेल्यानंतर अनेकजण मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कारचा पर्याय शोधत असतात. मात्र अशा कारच्या किमती देखील जास्त असतात. त्यामुळे अनेकजण ७ सीटर कार खरेदी करणे टाळतात.

तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ११ लाखांच्या बजेटमध्ये शानदार ७ सीटर कार शोधत असाल तर तुमच्यासाठी ऑटो मार्केटमध्ये टोयोटापासून महिंद्रापर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. या कार खरेदी करून तुमचाही मोठा फायदा होऊ शकतो.

खालील ७ सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहेत.

रेनॉल्ट ट्रायबर

तुम्हीही देशातील सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट फीचर्स असलेली ७ सीटर कार खरेदीसाठी शोधत असाल तर तुमच्यासाठी रेनॉल्ट ट्रायबर कार सर्वोत्तम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.34 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आहे. कारमध्ये 999 cc इंजिन देण्यात येत हे. तसेच कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात येत आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्तात एर्टिगा ७ सीटर कार उपलब्ध करून दिली आहे. या कारला देशात प्रचंड मागणी आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे. कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. ही कार सीएनजी पर्यायांमध्ये देखील आहे.

टोयोटा Rumion

टोयोटा कंपनीकडून मारुती सुझुकीच्या एर्टिगा कारवर आधारित स्वस्त आणि दमदार मायलेज इंजिन असलेली ७ सीटर कार Rumion ऑटो बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे. कारमध्ये 1462 सीसी इंजिन देण्यात आले आहे. ही कार सीएनजी पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो ७ सीटर कार देखील तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.78 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.79 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

Kia Carens

किआ कार उत्पादक कंपनीची Carens ७ सीटर कार देखील सर्वोत्तम आहे. या कारची बाजारात मागणी देखील अधिक आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे. कारमध्ये 1493 सीसीचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात येत आहे.