Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Budget 7 Seater Cars : देशातील या SUV आहेत उत्तम 7 सीटर कार, मिळतात लक्झरी फीचर्स, किंमत फक्त…

ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील १० लाख रुपयांच्या आसपास आहेत. कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Budget 7 Seater Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहेत. तसेच कारच्या किमती देखील खूपच आहेत. वाढत्या महागाईबरोबरच कारच्या किमती देखील वाढत आहेत. पण बाजारात आजही कमी किमतीतील शानदार MPV कार उपलब्ध आहेत.

मोठ्या फॅमिलीसाठी तुम्हीही कमी किमतीतील सर्वोत्तम ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुतीपासून टोयोटापर्यंतच्या स्वस्त कार उपलब्ध आहेत. या ७ सीटर कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात येत आहेत.

Kia Carens

किआ कंपनीकडीन भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार सादर केल्या आहेत. त्यांच्या Seltos कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच किआने त्यांची Carens ७ सीटर कार देखील सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि डिझले असे दोन इंजिन पर्याय देण्यात येत आहेत.

टोयोटा रुमिओन

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून नुकतीच मारुती एर्टिगावर आधारित रुमिओन ७ सीटर कार सादर केली आहे. या कारची किंमत देखील खूपच कमी ठेवण्यात आली आहे. मारुती एर्टिगा कारचे इंजिन या कारमध्ये पाहायला मिळते. ही कार सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी एर्टिगा

 

मारुती सुझुकीकडून त्यांची एर्टिगा ७ सीटर कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. ही कार सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या अनेक ७ सीटर कार सादर केल्या आहेत. महिंद्रा बोलेरो निओ कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे. ही कार फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर ही ७ सीटर कार देखील तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे. ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.34 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 999 सीसी इंजिन देण्यात आले आहे. तसेच रेनॉल्ट ट्रायबर कार पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.