Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Budget Automatic SUV Cars : गर्दीच्या ठिकाणी सहज चालतात या जबरदस्त ऑटोमॅटिक SUV, किंमत ७ लाखांपासून सुरु…

भारतात अनेक कंपन्यांच्या ऑटोमॅटिक एसयूव्ही कार सादर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील खूपच जास्त आहेत. मात्र काही एसयूव्ही ७ लाख रुपयांच्या किमती उपलब्ध आहेत.

0

Budget Automatic SUV Cars : भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटोमॅटिक कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील जास्त आहेत. मात्र जर तुम्हाला कमी किमतीतील शानदार ऑटोमॅटिक एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत.

गर्दीच्या ठिकाणी मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या एसयूव्ही कार चालवणे खूप कठीण आहे. त्यामुळे आता अनेकजण ऑटोमॅटिक एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. खालील ऑटोमॅटिक एसयूव्ही कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या किमती देखील खूपच कमी आहेत. टाटा पंच कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या पंच कारची एक्स शोरूम किंमत 7.50 लाख ते 10.10 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह 5 MT आणि 5 MT चा पर्याय देण्यात आला आहे.

ह्युंदाई एक्स्टर

ह्युंदाई मोटर्सकडून देखील त्यांच्या स्वस्त दमदार मायलेज देणाऱ्या Exter एसयूव्ही कारमध्ये देखील 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. Exter ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 7.97 लाख ते 10.10 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट किगर

रेनॉल्ट किगर एसयूव्ही कारमध्ये देखील 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.47 लाख रुपये ते 11.23 लाख रुपये आहे. त्यामुळे ही एक स्वस्त ऑटोमॅटिक कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकीच्या अनेक एसयूव्ही कार बाजारात उपलब्ध आहेत. या एसयूव्ही कारला मागणी देखील अधिक आहे. मारुतीच्या फ्रॉन्क्स एसयूव्ही कारमध्ये 5 MT आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकमध्ये देण्यात आली आहे. कारची किंमत 8.88 लाख रुपये ते 12.98 लाख रुपयांपर्यंत आहे.

टाटा नेक्सॉन

टाटाच्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन कारमध्ये देखील देखील ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.65 लाख ते 14.60 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे.