Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Budget Sunroof Cars : लक्झरी फीचर्स आणि कमी बजेटमध्ये येतात या सनरूफ कार, पहा यादी

0

Budget Sunroof Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये नवनवीन कार लाँच केल्या जात आहेत. या कारमध्ये बदलत्या काळानुसार अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले जात आहेत. तुम्हालाही उत्तम फीचर्स सनरूफ कार खरेदी करायची असेल तर ह्युंदाईपासून टाटापर्यंतच्या अनेक कार उपलब्ध आहेत.

ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ फीचर्स देण्यात आले आहे. क्रेटा ही एक उत्तम सनरूफ असलेली एसयूव्ही कार आहे. कारमध्ये 10.25-इंचाचा डिस्प्ले, ड्युअल-झोन एसी, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, 8-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सुसज्ज सीट्स असे अनेक फीचर्स देण्यात येत आहेत.

महिंद्रा XUV700

महिंद्राच्या XUV700 या एसयूव्ही कारमध्ये देखील ग्राहकांना सनरूफ सारखे फीचर्स दिले जात आहे. XUV700 एसयूव्ही कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ सोबत 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, हवेशीर फ्रंट सीट्स, 7 एअरबॅग्ज, EBD सह ABS असे फीचर्स उपलब्ध आहेत.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सकडून त्यांची नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्ही कार अलीकडेच ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या एसयूव्हीमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 10.25-इंचाचा पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सनरूफ, ऑटो एसी, वायरलेस फोन चार्जिंग, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Kia Seltos

किआ कार उत्पादक कंपनीकडून देखील त्यांच्या Seltos फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ दिले आहे. तसेच कारमध्ये ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग, एलईडी साउंड मूड लाइटिंग, हेड-अप डिस्प्ले आणि एसी फ्रंट सीट्स अशी अनके वैशिष्ट्ये दिली आहेत.