Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 10 Lakh SUVs : 10 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये खरेदी करा या उत्तम मायलेज SUVs, पहा यादी

भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारची क्रेझ सुरु आहे. अशातच तुम्हालाही कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देणारी एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटा ते मारुतीच्या एसयूव्ही उपलब्ध आहेत.

0

Under 10 Lakh SUVs : देशात सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अनेकजण नवीन कार खरेदी करताना सर्वात प्रथम एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या दमदार एसयूव्ही कार उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ब्रेझा एसयूव्ही कार ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ब्रेझा कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुतोये आहे. कारमध्ये 1462cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 17.38 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून देखील कमी बजेट ग्राहकांचा विचार करता त्यांच्या अनेक 10 लाखांपेक्षा कमी किमतीतील एसयूव्ही कार सादर केल्या आहेत. टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कार तुमच्यासाठी एक उत्तम एसयूव्ही कार पर्याय आहे.

कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. कारमध्ये 1199cc इंजिन दिले आहे. ही कार 20.09 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई मोटर्सने अलीकडेच त्यांची मायक्रो एसयूव्ही कार Exter लाँच केली आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. कारमध्ये 1197cc इंजिन दिले आहे. ही कार 19.4 Kmpl मायलेज देते.

मारुती सुझुकी Fronx

मारुती सुझुकी नेहमीच मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर करत असते. मारुतीची स्वस्त एसयूव्ही कार Fronx देखील तुमच्यासाठी उत्तम ५ सीटर कार पर्याय आहे.

कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे. Fronx कारमध्ये 1197cc पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार 21.79 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

 

टाटा Nexon फेसलिफ्ट

टाटा मोटर्सची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार तुमच्यासाठी एक सुरक्षित एसयूव्ही कारचा पर्याय आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे.

कारमध्ये 1199cc इंजिन पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल मॉडेलमध्ये 17.44 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.