Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

कार खरेदी करताय ? Mahindra कंपनीच्या ‘या’ 9 गाड्यांची किंमत पहा एका क्लिकवर !

0

Mahindra Car Price List : जर तुम्ही कार खरेदीसाठी निघाला असाल तर थोडं थांबा ! कार खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून जावा. खरे तर भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपल्या कंपनीचा नावलौकिक वाढवला आहे. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा देखील समावेश होतो. या कंपनीने देशात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार लॉन्च केल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या या गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये चांगली मागणी देखील आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाखो ग्राहक आहेत आणि या ग्राहकांमध्ये या कंपनीबाबत मोठी विश्वासहर्ता पाहायला मिळते. एका आकडेवारीनुसार गेल्या नोव्हेंबर महिन्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या 40 हजार SUV गाड्या विकल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे महिंद्रा कंपनीच्या गाडीच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. अशा स्थितीत जर तुम्हीही महिंद्रा कंपनीची कार घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी एसयूवी गाड्यांची लेटेस्ट किंमत जाणून घेणार आहोत.

महिंद्रा XUV300 : देशात अलीकडे एसयुव्ही गाड्यांची मागणी वाढली आहे. तरुणांमध्ये एसयूवी गाड्यांची मोठी क्रेझ आहे. यामध्ये महिंद्राच्या लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV XUV300 चा देखील समावेश होतो. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 14.76 लाख रुपये एवढी आहे.

महिंद्रा XUV300
महिंद्रा XUV300

महिंद्रा बोलेरो निओ : महिंद्रा बोलेरोच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने या गाडीची निर्मिती केली आहे. बोलेरो निओ देखील अलीकडे ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रिय बनली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 9.64 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.15 लाख रुपयांपर्यंत जाते.

 

महिंद्रा बोलेरो : ही भारतातील ग्रामीण भागात सर्वात पसंत केले जाणारी कार आहे. ही गाडी महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी वाहनांपैकी एक आहे. महिंद्राच्या अनेक लोकप्रिय गाड्यांपैकी एक असलेली ही गाडी आपल्या किमतीमुळे देखील सर्वसामान्यांच्या मनात घर करून गेली आहे. बोलेरोची एक्स-शोरूम किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 10.80 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा थार : तरुणांमध्ये या गाडीची मोठी क्रेज आहे. या गाडीचा लूक हा तरुणांना मोठा मोहत आहे. ही महिंद्रा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही कार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 10.98 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 16.94 लाख रुपये एवढी आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन : महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्लासिक या गाडीच्या यशानंतर कंपनीने या नवीन गाडीची निर्मिती केली. महिंद्राच्या SUV Scorpio-N ही भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. ही महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी SUV कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.26 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक : Mahindra Scorpio Classic ही महिंद्रा कंपनीची ग्रामीण भागात सर्वात विक्री होणारी एक लोकप्रिय कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 17.06 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा मराझो : महिंद्रा ही देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला एक प्रमुख ब्रँड आहे. या ब्रँडची Mahindra Marazzo ही MPV सेगमेंट विभागातील एक प्रमुख कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत रु. 14.12 लाखापासून सुरू होते आणि रु. 16.48 लाखांपर्यंत जाते.

महिंद्रा XUV700 : ही महिंद्राची सर्वात लोकप्रिय SUV आहे. तरुणांमध्ये या गाडीचा एक मोठा चाहता वर्ग पहिला नव्हतो. शहर असो की ग्रामीण भाग असो या गाडीची सर्वत्र चर्चा होते. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.03 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.57 लाखांपर्यंत जाते.

महिंद्रा XUV400 EV : महिंद्राने लॉन्च केलेली ही इलेक्ट्रिक एसयुव्ही अल्पावधीतच ग्राहकांमध्ये विश्वास पात्र ठरली आहे. महिंद्रा कंपनीची ही एकमेव इलेक्ट्रिक SUV आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.39 लाख रुपयांपर्यंत जाते.