Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

C3 Aircross vs Elevate SUV कोणती आहे सर्वोत्तम कार? खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

तुम्हीही C3 Aircross किंवा Elevate एसयूव्ही कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर त्याआधी तुम्ही दोन्ही कारपैकी कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट आहे हे जाणून घ्या.

0

C3 Aircross vs Elevate SUV : देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार बाजारात सादर केल्या जात आहेत. नुकत्याच आणखी दोन शक्तिशाली एसयूव्ही कार बाजारात सादर केल्या आहेत. Citroen C3 Aircross आणि Honda Elevate या दोन एसयूव्ही कार बाजारात सादर करण्यात आल्या आहेत.

तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी C3 Aircross आणि Honda Elevate या दोन एसयूव्ही कार सर्वोत्तम पर्याय आहेत. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

होंडा कंपनीकडून त्यांची ५ सीटर कार Elevate एसयूव्ही भारतीय ऑटो बाजारात सादर केली आहे. तर Citroen ने त्यांची C3 Aircross ही ७ सीटर एसयूव्ही कार सादर केली आहे. कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

Citroen C3 Aircross आणि Honda Elevate चे इंजिन

Citroen C3 Aircross या ७ सीटर कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 108 hp पॉवर आणि 190 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून देखील अलीकडेच Elevate एसयूव्ही कार सादर केली आहे. कारमध्ये 1.5-litre i-VTEC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 119 hp पॉवर आणि 145 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. इंजिन 6MT किंवा पर्यायी CVT सह देण्यात आले आहे.

Citroen C3 Aircross आणि Honda Elevate च्या किमती

होंडा आणि Citroen कार कंपनीकडून त्यांच्या कमी बजेट कार बाजारात सादर केल्या आहेत. होंडा Elevate एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 11 लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाखांपर्यंत जाते.

Citroen कंपनीने C3 Aircross या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये ठेवली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.30 लाख रुपये आहे. Citroen C3 Aircross देखील ड्युअल-टोन कलर फिनिश आणि Vibe पॅकमध्ये ऑफर केली आहे.

Citroen C3 Aircross ही एसयूव्ही कार ७ सीटर पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. तर होंडा Elevate एसयूव्ही कार ५ सीटर पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कार निवडू शकता.