Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

C3 Aircross vs Seltos : नवीन Seltos किंवा C3 Aircross खरेदीचा प्लॅन आहे? तर त्याआधी जाणून घ्या किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती आहे बेस्ट SUV

भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या एकापेक्षा एक शानदार एसयूव्ही कार सादर केल्या आहेत. तुम्हीही Seltos किंवा C3 Aircross एसयूव्ही पैकी एक उत्तम कार खरेदी करू शकता.

0

C3 Aircross vs Seltos : भारतीय ऑटो क्षेत्रात सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या नवीन वैशिष्ट्यांसह अनेक कार लॉन्च केल्या जात आहेत. तुम्हीही C3 Aircross किंवा नवीन Seltos एसयूव्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी दोन्ही एसयूव्हीबद्दल जाणून घ्या.

अलीकडेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये Citroen ने त्यांची C3 Aircross ५ आणि ७ सीटर कार लॉन्च केली आहे. ही कार एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. तर कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे.

Citroen C3 Aircross कार सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या क्रेटा आणि किया सेल्टोसशी स्पर्धा करते. त्यामुळे नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्यापूर्वी त्यामधील सर्व फीचर्स किंमत आणि मायलेजच्या बाबतीत जाणून घेणे गरजेचे आहे.

Citroen C3 Aircross आणि Kia Seltos ची किंमत

किआ कार उत्पादक कंपनीकडून अलीकडेच त्यांच्या Seltos कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.30 लाख रुपये आहे.

तर C3 Aircross SUV कार एक्स शोरूम किंमत 9.99 लाख ते 11.99 लाख रुपये किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामुळे तसे पाहायला गेल्यास C3 Aircross एसयूव्ही कारपेक्षा Seltos एसयूव्ही खूपच महाग आहे.

Citroen C3 Aircross आणि Kia Seltos चे इंजिन

C3 Aircross SUV कार पेट्रोल इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायासह सादर करण्यात आली आहे. कारमध्ये 1.2-लिटर PureTech इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. तसेच कारचे इंजिन 5,500 rpm वर 08 bhp कमाल पॉवर आणि 1,750 rpm वर 190 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 19 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

किआ Seltos फेसलिफ्ट कारमध्ये 1.5-लीटर स्मार्टस्ट्रीम MPI पेट्रोल इंजिन आणि दुसरे 1.5-लीटर स्मार्टस्ट्रीम T-GDI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये 1.5-लीटर CRDi VGT इंजिन देखील देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये 17.0 to 17.7 kmpl आणि डिझेल व्हेरियंटमध्ये 19.1 to 20.7 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Citroen C3 Aircross आणि Kia Seltos ची वैशिष्ट्ये

C3 Aircross एसयूव्ही कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESP, HHA, TPMS, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर, मागील आर्मरेस्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, टिल्ट अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किआ सेल्टोस फेसलिफ्टमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. 6 एअरबॅग्ज आणि 3 पॉइंट सीट बेल्ट, ABS (अँटी-लॉक ब्रेक सिस्टम), BAS (ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टम), ऑल व्हील डिस्क ब्रेक, ESC (इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण), आणि VSM अशी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.