Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car AC Tips : हिवाळ्याच्या दिवसांत कारमध्ये हिटर चालवताय? होऊ शकते मोठे नुकसान, त्वरित जाणून घ्या फायदे तोटे

0

Car AC Tips : हिवाळाच्या दिवसांत कार चालवताना अनेकांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात कार चालक कारमध्ये हिटर चालवत असतात तर उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

एसी चालू केल्याने कारचे केबिन आतमध्ये थंड राहते तर हिवाळ्यात हिटर चालू केल्याने कारच्या केबिनमध्ये गरम उब तयार होत असते. मात्र हिवाळ्यात देखील एसी चालवावा का? असा अनेकांना प्रश्न पडत असतो.

हिवाळ्यात अनेकजण एसी ऐवजी हिटर वापरत असतात. मात्र कारमध्ये हिटर चालवणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात देखील एसी वापरणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

हिवाळ्यात देखील कारमध्ये हिटर ऐवजी एसी कार चालवावा असा प्रश्न आता तुम्हाला देखील पडला असेल. चला तर जाणून घेऊया हिटर आणि एसी याबद्दल अधिक माहिती.

हिवाळ्याच्या दिवसांत अनेकजण फक्त हिटर चालू ठेऊन कारमध्ये गरम वातावरण तयार करत असतात. मात्र सतत हिटरचा वापर करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कारची धोक्याचे ठरू शकते.

सतत हिटरचा वापर करणे तुमच्या कारच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे कमी कमी आठवड्यातून 30 मिनिटे एसी चालवणे गरजेचे आहे.

फायदे काय आहेत?

तुम्ही थंडीच्या दिवसांत फक्त हिटर वापरत असाल तर ते नुकसानीचे ठरू शकते. जर तुम्ही अशा दिवसांमध्ये फक्त हिटरचा वापर न करता एसीचा देखील वापर केल्यास कारचा कंप्रेसर, एसी व्हेंट आणि कूलिंग सिस्टिम व्यवस्थित काम करत राहील.

तोटे काय आहेत?

हिवाळाच्या दिवसांमध्ये कारच्या काचेवर वाफ तयार होत असते. त्यामुळे अनेकजण ही वाफ घालवण्यासाठी हिटर चालू करतात. मात्र हिटर चालू केल्याने वाफेचे पाण्यात रूपांतर होते आणि हे पाणी इग्निशन सिस्टीममध्ये म्हणजेच इंजिनपर्यंत पोहोचून इंजिनमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

सतत हिटरचा वापर केल्याने कारमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. एसी चालू ठेवल्याने कारमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याची फारच कमी असते.