Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car Comparison : Punch, Exter आणि Kiger च्या तुलनेत नवीन Magnite AMT SUV कशी आहे? पहा किंमत आणि फीचर्स

नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण गोंधळात पडत असतात. त्यामुळे कार खरेदी करण्याअगोदर त्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. Punch, Exter आणि Kiger या कारसमोर नवीन Magnite AMT SUV कशी आहे ते एकदा जाणून घ्या.

0

Car Comparison : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहेत. एसयूव्ही कारला देशात प्रचंड मागणी आहे. अलीकडेच Nissan कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Magnite एसयूव्ही कारचे AMT मॉडेल सादर केले आहे.

मात्र या सेगमेंटमध्ये Magnite AMT ही एकटीच कार नसून टाटा पंच, ह्युंदाई Exter आणि Renault Kiger सारख्या कारचा देखील समावेश आहे. Magnite AMT कार या सर्व एसयूव्ही कारशी स्पर्धा करते.

Nissan कडून त्यांच्या Magnite एसयूव्ही कारला नवीन AMT गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आता या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. AMT गिअरबॉक्ससह येणाऱ्या एसयूव्ही कारची सध्या क्रेझ सुरु आहे.

किंमतीत कोण अधिक परवडणारे आहे?

Nissan कार उत्पादक कंपनीकडून त्यांची नवीन Magnite AMT कार सुरुवातीच्या 6.49 लाख रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये सादर केली आहे. तसेच ही कार कुरो एडिशनसह एकूण ५ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

मॅग्नाइटची सुरुवातीचींब एक्स शोरूम किंमत ६.४९ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ८.८९ लाख रुपये आहे. रेनॉल्ट किगर एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.57 लाख रुपये आहे. या कारच्या चार व्हेरियंटमध्ये AMT गिअरबॉक्स पर्याय दिला जात आहे.

ह्युंदाई मोटर्सने अलीकडेच त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या AMT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.09 लाख ते 10.14 लाख रुपये आहे. हुंदाई Exter कार एकूण ६ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

Tata Panch एसयूव्ही सध्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात येत आहे. लवकरच या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील सादर केले जाणार आहे. पंच कारच्या एकूण 13 व्हेरियंट AMT गिअरबॉक्स दिला जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.49 लाख ते 10.14 लाख रुपये आहे.

जर तुम्ही किमतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वात स्वस्त मॅग्नाइट एसयूव्ही असल्याचे पाहायला मिळत आहे. ह्युंदाई Exter, टाटा Punch आणि रेनॉल्ट किगर एसयूव्ही कार मॅग्नाइट एसयूव्ही कारपेक्षा महाग आहेत.

इंजिन तपशील

Nissan कार कंपनीकडून त्यांच्या मॅग्नाइट एएमटी कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. तसेच या कारच्या 1.0-लिटर टर्बो पेट्रोलला CVT गिअरबॉक्स देण्यात येत आहे.

Hyundai Exter एसयूव्ही कारमध्ये AMT गिअरबॉक्स 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर टाटा मोटर्सच्या पंच एसयूव्हीला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. Exter आणि पंच एसयूव्ही कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आहे मात्र या सीएनजी कारला मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे.