Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car Comparison : Nexon Facelift, Kia Seltos आणि Creta कोणती आहे बेस्ट कार? जाणून इंजिनपासून किमतीपर्यंत सर्वकाही…

नवीन एसयूव्ही कार खरेदी करायची आहे मात्र Nexon Facelift, Kia Seltos आणि Creta या कारच्या गोंधळात आहात? तर काळजी करू नका. यापैकी कोणती एसयूव्ही कार बेस्ट आहे ते जाणून घ्या.

0

Car Comparison : देशातील ऑटो बाजारात सध्या अनेक कंपन्यांच्या कार लोकप्रिय होत आहेत. तसेच ऑटो कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स जोडले जात आहेत. तसेच डिझाईनपासून इंजिनपर्यंत बदल केले जात आहेत.

भारतीय ऑटो बाजारात सध्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार अलीकडेच लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये डिझाईनपासून अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. Nexon फेसलिफ्ट कार Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या एसयूव्ही कारशी स्पर्धा करते.

आता तुम्हालाही Nexon फेसलिफ्ट, Hyundai Creta आणि Kia Seltos या एसयूव्ही कारपैकी कोणती कार खरेदी करायची असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. तुम्ही या ठिकाणी कोणती कार बेस्ट पर्याय आहे ते जाणून घेऊ शकता.

Tata Nexon फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केले आहेत. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. टाटा मोटर्सने Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल असे तीन इंजिन पर्याय दिले आहेत.

हे इंजिन 5-स्पीड, 6-स्पीड AMT, 7-स्पीड DCT आणि CVT गिअरबॉक्ससह ऑफर करण्यात येत आहेत. Nexon फेसलिफ्ट कार सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांमध्ये सादर करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने या कारला कर्व्ह डिझाईन देण्यात आले आहे. आगामी काळात टाटाच्या अनेक कार कर्व्ह डिझाईनवर आधारित असणार आहेत. Nexon फेसलिफ्टचे डॅशबोर्ड पूर्णपणे नवीन देण्यात आले आहे.

Hyundai Creta आणि Kia Seltos चे इंजिन

ह्युंदाई मोटर्सची Creta एसयूव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच किआने त्यांच्या Seltos कारचे देखील फेसलिफ्ट मॉडेल अलीकडेच सादर केले आहे. या फेसलिफ्ट मॉडेल ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Creta आणि Seltos या दोन्ही एसयूव्ही कारमध्ये सारखेच इंजिन दिले जात आहे.

दोन्ही कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 1.4 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन दिले जात आहे. हे इंजिन पर्याय MT,AT, iMT आणि DCT गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. दोन्ही कारमध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

ह्युंदाई Creta कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपये आहे तर Kia Seltos कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे. किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत टाटा Nexon फेसलिफ्ट या दोन्ही कारच्या पुढे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एसयूव्ही कारचा पर्याय निवडू शकता.