Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car Discount Offer : संधीच करा सोनं! या दोन शक्तिशाली SUV वर मिळतेय 1.30 लाखांची बंपर सूट, त्वरित घ्या फायदा…

नवीन कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण दोन शक्तिशाली जबरदस्त एसयूव्ही कारवर तब्बल 1.30 लाखांची बंपर सूट देण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही कार खरेदी करून पैशांची बचत करू शकता.

0

Car Discount Offer : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सप्टेंबर २०२३ या महिन्यात चांगली संधी आहे. कारण या महिन्यात Jeep कार उत्पादक कंपनीच्या कारवर 1.30 लाखांची बंपर सूट दिली जात आहे.

जीप कंपनीकडून Compass आणि Meridian या दोन शक्तिशाली एसयूव्ही कारवर 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच कंपनीच्या ग्रँड चेरोकी कारवर 4.50 लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

जीप कंपास SUV सवलत ऑफर

जीप कंपनीच्या कंपास या शक्तिशाली एसयूव्ही कारवर सप्टेंबर २०२३ मध्ये मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही देखील ही कार खरेदी करून मोठी आर्थिक बचत करू शकता. कंपास SUV कारमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. कंपनीकडून या SUV कारचे पेट्रोल व्हर्जन बंद करण्यात आले आहे.

कारला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4×4 सह 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जीप कंपास एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 21.73 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 32.07 लाख रुपये आहे.

Meridian SUV सवलत ऑफर

जीप कंपनीकडून त्यांच्या Meridian या शानदार एसयूव्ही कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या महिन्यात या कारवर 1.30 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहे. ही ऑफर केवळ ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देण्यात येणार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 33.40 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 38.61 लाख रुपये आहे.

जीप ग्रँड चेरोकी वर ऑफर

जीप कार उत्पादक कंपनीच्या ग्रँड चेरोकी या एसयूव्ही कारवर 4.50 लाखांपर्यंत सूट दिली जात आहे. मात्र कंपनीकडून याबाबत काहीही माहिती उघड केलेली नाही. कंपनीच्या या कारच्या काही युनिट्सवरच ही ऑफर देण्यात आली आहे असे सांगण्यात येत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 80.50 लाख रुपयांपासून सुरु होते.