Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car In 1 Lac : फक्त १ लाखात मिळतीये ही जबरदस्त कार, जाणून घ्या ऑफरबद्दल..

0

दिवाळीच्या शुभ पर्वावर नवीन कारची खरेदी केली जाते. जर तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर फक्त १ लाखात तुम्ही देशातील सर्वात लोकप्रिय कार घरी आणू शकता. जाणून घ्या या खास ऑफेरबद्दल.

Maruti Alto 800 ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी कार असून, फक्त 1 लाखात तुम्ही ही कार घरी आणू शकता. दरम्यान, Maruti Alto 800 भारतीय बाजारात आपली लोकप्रियता ही आपल्या मायलेज आणि कमी किमतीमुळे टिकवून आहे. यामुळे ती सर्वांच्या पसंतीची कार आहे.

Maruti Alto 800 ची किंमत 3.54 लाख रुपये आहे. तर ऑन रोडसाठी हा खर्च 4 लाख पर्यंत जातो. दरम्यान, या कारला 999 cc पेट्रोल इंजिन आहे जे उत्तम कार्य करते. यासोबतच ही कार तुम्हाला CNG पर्यायामध्ये देखील मिळते. याव्यतिरिक्त ही कार 31 किलोमीटरपर्यंत मायलेज सुद्धा देते.

दरम्यान, ही कार त्याचा स्टॅन्डर व्हेरियंटमध्ये म्हणजेच पेट्रोलच्या पर्यायामध्ये सुद्धा येतो. दरम्यान, या गाडीला तुम्हाला प्रति लिटर 22 किलोमीटरपर्यंत मायलेज सुद्धा मिळते.

तुम्ही या कारचे सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता. कारण OLX या वेबसाइटवर तुम्हाला 2011या मॉडेलची मारुती अल्टो फक्त 1 लाखांमध्ये खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप फायद्यामध्ये राहणार आहेत.

तसेच Droom या वेबसाइटवर तुम्हाला याच काराचे 2013 मॉडेल मारुती ऑटो 800 फक्त 1.7 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.

तर Droom या वेबसाइटवर तुम्हाला आणखी एक ऑफर देण्यात येत आहे. ज्याद्वारे तुम्ही 3 लाख किंमत असणारे 2017 चे मॉडेल मारुती अल्टो 800 खरेदी करू शकता.

दरम्यान, नवीन गाडी खरेदी करण्या ऐवजी जर तुम्ही सेकण्ड हॅन्ड गाडी खरेदी केली तर तुम्हाला 3,00,000 पर्यंत बचत करता येणार आहे.