Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car Launched In September : सप्टेंबरमध्ये लॉन्च झाल्या या शानदार कार, Nexon फेसलिफ्ट ते होंडा Elevate चा समावेश…

भारतीय ऑटो मार्केटमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये अनेक कंपन्यांच्या शानदार कार लॉन्च झाल्या आहेत. तसेच या कारच्या किमती देखील कमी आहेत.

0

Car Launched In September : भारतीय ऑटो मार्केटसाठी सप्टेंबर २०२३ हा महिना खास ठरला आहे. कारण या महिन्यात अनेक कंपन्यांच्या जबरदस्त कार लॉन्च झाल्या आहेत. टाटा मोटर्स ते होंडा कार कंपन्यांकडून त्यांच्या एसयूव्ही कार सादर केल्या आहेत.

Renault Kiger, Kwid आणि Triber अर्बन नाईट एडिशन

Renault कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Kiger, Kwid आणि Triber कारचे Urban Night Limited Edition लाँच केले आहे. या कारमध्ये नवीन रंग पर्याय आणि वैशिष्ट्ये मिळणार आहेत. Renault ने म्हटले आहे की किगर आणि ट्रायबर अर्बन नाईट एडिशन्स त्यांच्या टॉप व्हेरियंटपेक्षा 14,999 रुपयांनी महाग असणार आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन फेसलिफ्ट कार सादर केली आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 8.09 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट

टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट देखील या महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. ही कार भारतात 14.74 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.94 लाख रुपये आहे.

होंडा एलिव्हेट

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची शक्तिशाली इंजिनसह Elevate एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. या कारचे बुकिंग जोरदार सुरु आहे. ही कार 11 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीपासून सादर करण्यात आली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाख रुपयांपर्यंत जाते.

Hyundai i20 फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची i20 फेसलिफ्ट कार भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या हॅचबॅक कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. कारमध्ये कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे.