Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Car Reserve Capacity : कार रिझर्व्ह मोडवर गेल्यावर किती लांब जाऊ शकते ? जाणून घ्या रिझर्व पेट्रोल कॅपॅसिटीची माहिती

तुमच्याकडेही कार असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की रिझर्व्ह मोडवर कार किती किमती धावू शकते तर आज तुम्ही जाणून घेऊ शकता. तसेच रिझर्व्हमध्ये किती पेट्रोल असते हे देखील तुम्हाला माहिती होईल.

0

Car Reserve Capacity : आजकाल अनेकांकडे वेगवेगळेया कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक कारचे मायलेज देखील वेगवेगळे असते. काही कार सध्या पेट्रोल आणि सीएनजीमध्ये येत आहेत तर काही पेट्रोल आणि इलेक्ट्रिकमध्ये येत आहेत. तसेच प्युअर पेट्रोल आणि डिझेल कार देखील बाजारात उपलब्ध आहेत.

कार किंवा बाईकमध्ये एक रिझर्व पेट्रोल म्हणून पर्याय असतो. मात्र अनेकदा काहीजण कारची रिझर्व पेट्रोल कॅपॅसिटी किती आहे हे जाणून घेत नाहीत. त्यामुळे अनेकदा कारमधील पेट्रोल संपते. त्यामुळे कारची रिझर्व्ह पेट्रोल कॅपॅसिटी किती आहे हे माहिती असले पाहिजे.

तुमच्याकडे असलेल्या कारची रिझर्व्ह पेट्रोल कॅपॅसिटी किती आहे आणि रिझर्व्ह पेट्रोल कॅपॅसिटीमध्ये कार किती किलोमीटरपर्यंत धावू शकते हे जाणून घेईचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

कारच्या रिझर्व्ह कॅपॅसिटीमध्ये किती पेट्रोल असते?

बाईक चालवत असताना बाईकमध्ये एक पेट्रोल इंजिनपर्यंत जाण्यासाठी नॉब दिलेला असतो. यामध्ये ऑन आणि रिझर्व्ह असे दोन पर्याय असतात. कारमध्ये जास्त पेट्रोल असेल तर तो नॉब ऑन वर असतो आणि बाईकमध्ये १ किंवा २ लिटर पेट्रोल शिल्लक राहिल्यानंतर तो नॉब आपण ऑन वर घेतो.

पण बाईकच्या विरुद्ध कारचे असते. कारमध्ये असा कोणत्याही प्रकारचा नॉब नसतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कारचा रिझर्व्ह कधी लागणार आहे हे कसे ओळखायचे. तर हे अगदी सोपे आहे.

कारमध्ये ECU जोडलेला असतो. हा ECU कारची सगळी सिस्टीम मॉनिटर करत असतो. हा ECU कारला किती पेट्रोल देवीचे आहे हे देखील ECU ठरवत असतो. त्यामुळे कारमध्ये रिझर्व्हचे चिन्ह नसते. मात्र कारमध्ये एक ऑरेंज रंगाचे पेट्रोल चिन्ह दिसेल. हे चिन्ह कारच्या क्लस्टर डिस्प्लेमध्ये दिसेल.

या ऑरेंज रंगाच्या चिन्हांमध्ये तुम्हाला तुमच्या कारचे पेट्रोल कमी आहे हे दर्शवते. कारचे पेट्रोल कमी असले की यामध्ये लाईट लागते. ह्युंदाई मोटर्सची i20 कार चाचणीसाठी घेतली असता कार रिझर्व्ह लागल्यानंतर पूर्ण पेट्रोल संपेपर्यंत चालवण्यात आली.

ही कार रिझर्व्ह लागल्यांनंतर पूर्ण पेट्रोल संपेपर्यंत ४८ ते ५० किमीपर्यंत धावली. यावरून कार रिझर्व्ह लागल्यांनंतर किती किमी धावू शकते याचा एक अंदाज आला. यावरून एक अंदाज लावता कारच्या इंधन टाकीमध्ये असलेले पेट्रोलच्या १० टक्के पेट्रोल रिझर्व्ह लागल्यांनंतर शिल्लक असते हे दिसून आले.

कारचा रिझर्व्ह लागल्यानंतर कार काही किमी चालल्यानंतर कार हळू धावू लागेल. तुम्ही कार वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला तरीही कार जास्त वेगाने धावणार नाही. कारण कारमधील इंधन पूर्णपणे संपत आल्याचे ते दर्शवते. त्यामुळे कारचे पेट्रोल इंडिकेशन लागल्यानंतर त्वरित कारमध्ये पेट्रोल भरणे गरजेचे आहे.