Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Discount Offer : डिसेंबरपर्यंत या 3 SUVs वर 2 लाखांची बचत करण्याची संधी! मारुती ते महिंद्राच्या कारवर मिळतेय बंपर सूट

मारूती ते महिंद्रापर्यंतच्या कारवर ग्राहकांना मोठी सूट देण्यात येत आहे. तुम्हीही या महिन्यात नवीन कार खरेदी करून लाखोंची बचत करू शकता.

0

Cars Discount Offer : २०२३ चे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तसेच नवीन वर्षांमध्ये अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. मात्र या २०२३ च्या डिसेंबर महिन्यात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या शानदार SUVs वर बंपर सूट देत आहे.

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण या महिन्यात कार खरेदी करून तुम्ही देखील लाखोंची बचत करू शकता. महिंद्रा ते मारुतीपर्यंतच्या अनेक कारवर मोठी सूट दिली जात आहे.

देशातील अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या आकर्षक कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देत आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही लाखोंची बचत करू शकता. मारुती, महिंद्रा आणि Nissan कार कंपन्या त्यांच्या एसयूव्हीवर ही ऑफर देत आहे.

मारुती सुझुकी जिमनी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही जिमनी भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केली आहे. जर या महिन्यात तुम्ही जिमनी एसयूव्ही कार खरेदी केली तर तुम्हाला कार खरेदीवर 2 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जिमनी कारच्या Zeta व्हेरियंटवर ही सूट उपलब्ध आहे.

मारुती सुझुकीने त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारचे थंडर एडिशन लॉन्च केले आहे. त्यामुळे या कारची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपयांवरून 10.74 लाख रुपयांवर आली आहे. कारच्या अल्फा व्हेरियंटच्या थंडर एडिशनवर 1 लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

Mahindra XUV300 डिस्काउंट ऑफर

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV300 या एसयूव्ही कारवर देखील मोठी आकर्षक सूट दिली जात आहे. XUV300 एसयूव्ही कार खरेदीवर ग्राहकांना 1 लाख रुपयांची रोख सूट आणि 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

Nissan Magnite

Nissan कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Magnite या एसयूव्ही कारवर देखील आकर्षक सूट दिली जात आहे. या एसयूव्ही कारवर 90,000 रुपयांपर्यंतची रोख सूट दिली जात आहे. यामध्ये 25,000 रुपयांची रोख सवलत, 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. तसेच Nissan ऑटो कंपनीकडून त्यांच्या इतर एसयूव्ही कारवर देखील ऑफर दिली जात आहे.