Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Discount Offer : टाटा ते महिंद्रापर्यंतच्या SUVs वर मिळवा 4.2 लाख रुपयांपर्यंतची बंपर ऑफर ! ऑफर मर्यादित…

0

Cars Discount Offer : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 हे वर्ष संपून आता 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

कारण अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या शानदार कारवर इयर एंड डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही देखील लाखो रुपयांची बचत करू शकता. टाटा ते महिंद्रा त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देत आहे.

Citroen C5 Aircross

Citroen कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या C5 Aircross एसयूव्ही कारवर या महिन्यात 3.5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. त्यामुळे शिकार हरेदी करून तुम्ही 3.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही ऑफर डिसेंबर महिन्यापुरतीच मर्यादित आहे.

ह्युंदाई कार्स ऑफर

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारवर या महिन्यात ऑफर देण्यात येत आहे. Alcazar आणि Tucson SUV कारवर मोठी सूट दिली जात आहे. Alcazar च्या पेट्रोल व्हेरियंटवर 35 हजार रुपयांची सूट दिली जात आहे तर डिझेल व्हेरियंटवर 20 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच Tucson SUV कारवर 1.50 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिली जात आहे.

महिंद्रा कार्स डिस्काउंट ऑफर

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV400 आणि XUV300 या दोन स्टायलिश एसयूव्ही कारवर मोठी सूट दिली जात आहे. महिंद्रा कार उत्पादक कंपनी त्यांच्या XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारच्या टॉप व्हेरियंट EL वर सर्वात मोठी 4.2 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. एंट्री-लेव्हल EC व्हेरियंटवर 1.7 लाख रुपयांची सूट देत आहे. तसेच महिंद्रा त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारवर 45,000 ते 1.72 लाख रुपयांची सूट देत आहे.

मारुती सुझुकी

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही कारवर 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तर मारुती Fronx एसयूव्हीवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon EV कारवर या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. टाटा मोटर्स Nexon EV Max कारवर 2.60 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे. तसेच Nexon EV प्राइमच्या सर्व व्हेरियंटवर 1.90 लाख रुपयांची सूट उलब्ध आहे.