Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Discount Offer : महिंद्रा XUV300 पासून मारुती जिमनी पर्यंतच्या कारवर 2 लाखांच्या बचतीची संधी, आजच घ्या असा लाभ

नवीन कार खरेदीवर तुम्ही देखील लाखोंची बचत करू शकता. कारण अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कारवर इयर एंड ऑफर देत आहेत. त्याचा फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीत कार खरेदी करू शकता.

0

Cars Discount Offer : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक कंपन्यांच्या कारवर मोठी आकर्षक सूट दिली जात आहे. तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता.

महिंद्रा ते किआ कार उत्पादक कंपन्या त्यांच्या आकर्षक एसयूव्ही कारवर हजारोंची बंपर सूट देत आहे. ही ऑफर डिसेंबर २०२३ पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत कार खरेदी करून तुम्ही मोठी पैशांची बचत करू शकता.

Nissan Magnite SUV डिस्काउंट ऑफर

Nissan कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Magnite या छोट्या एसयूव्ही कारवर 90 हजार रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये 25,000 रुपयांची रोख सूट, 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेटचा समावेश आहे.

मारुती सुझुकी जिमनी SUV डिस्काउंट ऑफर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारवर देखील हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. जिमनी एसयूव्ही कारचे अलीकडेच नवीन एडिशन सादर करण्यात आले आहे.

कारवर २ लाख रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे कारची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपयांवरून 10.74 लाख रुपये झाली आहे. तर जिमनी एसयूव्हीच्या नवीन व्हेरियंटवर 1 लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

Mahindra XUV300 SUV डिस्काउंट ऑफर

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार XUV300 वर या महिन्यात 1.3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्यामुळे XUV300 एसयूव्ही कार खरेदी करून तुम्ही 1.3 लाख रुपयांची बचत करू शकता.

तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊन लाखोंची बचत करण्याचा विचार करून कार खरेदी करणार असाल तर तुमच्या जवळच्या डिलरशिपला भेट देऊन तुम्ही डिस्काउंट ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.