Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Discount : XUV400 ते Jimny SUV खरेदीवर करा 11.85 लाखांची बंपर बचत, असा घ्या त्वरित लाभ

0

Cars Discount : देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या दमदार कारवर इयर एंड ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार खरेदीवर तब्बल एक दोन नाही तर 11.85 लाखांची बचत करू शकता.

1. Jeep Grand Cherokee

जीप कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Grand Cherokee एसयूव्ही कारवर 31 डिसेंबर 2023 पर्यंत तब्बल 11.85 लाख रुपयांची बंपर ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदीवर 11.85 लाख रुपयांची बचत करू शकता.

2. Volkswagen Tiguan

Volkswagen कार उत्पादक कंपनीकडून देखील त्यांच्या शानदार Tiguan एसयूव्ही कारवर या महिन्यात इयर एंड ऑफर देण्यात येत आहे. Tiguan एसयूव्ही कारवर एकूण 4.20 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये रोख सवलत म्हणून 75,000, एक्सचेंज बोनस म्हणून 75,000 आणि १ लाख रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

3. महिंद्रा XUV400

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या एकमेव XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारवर या महिन्यात इयर एंड डिस्काउंट देण्यात येत आहे. XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही कारवर या महिन्यात 4.2 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. XUV400 इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्ही लाखोंची बचत करू शकता.

4. ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक

ह्युंदाई मोटर्स देखील त्यांच्या कोना इलेक्ट्रिक कारवर या महिन्यात ३ लाख रुपयांची बंपर सूट देत आहे. कोना इलेक्ट्रिक कार तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम 5 सीटर कार पर्याय आहे. कार खरेदीवर तुम्हाला ३ लाख रुपयांची बंपर बचत करायची असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर आगोदरच कार खरेदी करावी लागेल.

5. मारुती जिमनी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारचे नवीन एडिशन बाजारात लाँच केले आहे. मारुती त्यांच्या ऑफ रोडर जिमनी एसयूव्ही कारवर या महिन्यात २.२१ लाख रुपयांची सूट देत आहे. ऑफ रोडींग ड्रायव्हिंगचा आनंद घेईल असेल तर कमी बजेटमध्ये मारुती जिमनी उत्तम पर्याय आहे.