Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cars Lunched In Deceber 2024 : या महिन्यात लॉन्च होणार आलिशान कार्स, मिळणार शक्तिशाली इंजिन

डिसेंबर २०२३ या महिन्यात अनेक कार कंपन्यांच्या आलिशान कार लॉन्च केल्या जाणार आहेत. यामध्ये किआच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्हीचा देखील समावेश आहे.

0

Cars Lunched In Deceber 2024 : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कंपन्यांच्या उत्तम कार सादर करण्यात आल्या आहेत. तसेच आता अनेक कार कंपन्यांकडून डिसेंबर २०२३ या महिन्यात नवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण नवीन कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. किआ आणि जीपसह अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या नवीन कार सादर केल्या जाणार आहेत.

2023 किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून देशातील ऑटो मार्केटमधील एसयुव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. कंपनीकडून २०२० मध्ये Sonet एसयूव्ही कार भारतात लॉन्च करण्यात आली होती.

आता याच कारचे फेसलिफ्ट मॉडेल अनेक मोठ्या बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च केली जाणार आहे. 14 डिसेंबर Sonet फेसलिफ्ट कारचे अनावरण केले जाणार आहे. तसेच या कारच्या किमती २०२४ जानेवारीमध्ये जाहीर केल्या जाणार आहेत. कारमध्ये कॉस्मेटिक बदल आणि डिझाईन देखील बदलले आहे. चाचणी दरम्यान ही कार अनेकदा स्पॉट झाली आहे.

लॅम्बोर्गिनी रेव्हुल्टो

लॅम्बोर्गिनी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची रेव्हुल्टो हायब्रिड सुपरकार लॉन्च करण्यात येणार आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी भारतात Revalto हायब्रिड सुपरकार लॉन्च केली जाणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.9 कोटी रुपये असण्याचा दावा करण्यात येत आहे.

कारमध्ये 6.5 लीटर इंजिन आणि तीन इलेक्ट्रिक मोटर्स मिळण्याची शक्यता आहे. कारमध्ये दोन फ्रंट ई-एक्सल आणि एक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. दोन इलेक्ट्रिक मोटर्स पुढील चाकांना उर्जा देतात. तिसरी मोटर मागच्या चाकांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त शक्ती देऊ शकतात.

जीप कंपास पेट्रोल

जीप कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या कंपास कारचे पेट्रोल व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहे. 1.3-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन कारमध्ये दिले जाणार आहे. कंपनीकडून कंपास एसयूव्ही कारचे पेट्रोल व्हेरियंटची लॉन्च तारीख जाहीर केलेली नाही. लवकरच कंपनीकडून कंपास एसयूव्ही कारचे नवीन व्हेरियंट सादर केले जाणार आहे.