Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CB350 vs Classic 350 : कोणती आहे बेस्ट बाईक? पहा किंमत, इंजिन आणि वैशिष्ट्ये

नवीन बाईक खरेदी करताना अनेकजण दोन बाईकचा पर्याय निवडत असतात. मात्र त्यापैकी कोणती बाईक त्यांच्यासाठी फायदेशीर आहे हे त्यांना समजत नसते. अलीकडेच होंडाने रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 बाईकला टक्कर देणारी बाईक सादर केली आहे.

0

CB350 vs Classic 350 : नवीन बाईक खरेदी करताना अनेकजण बाईकची किंमत, वैशिष्ट्ये आणि इंजिनबद्दल माहिती घेऊनच ती बाईक खरेदी करण्याचा विचार करत असते. तुम्हालाही नवीन शक्तिशाली इंजिन असलेली बाईक खरेदीसाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत.

होंडा दुचाकी उत्पादक कंपनीकडून अलीकडेच त्यांची CB350 आणि CB350RS या दोन बाईक्सनंतर 350 cc प्लॅटफॉर्मवर आधारित तिसरी बाईक म्हणून CB350 शक्तिशाली बाईक लॉन्च केली आहे.

होंडा दुचाकी कंपनीने त्यांची CB350 बाईक नुकतीच लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि जावा सारख्या बाईक्सला टक्कर देते.

तुम्हालाही नवीन बाईक खरेदी करताना CB350 आणि रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईकबद्दल संभ्रमात असाल तर त्याआधी कोणती बाईक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे ते जाणून घ्या.

CB350 vs Classic 350 किंमत

होंडा दुचाकी कंपनीची CB350 भारतीय ऑटो मार्केटमध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 शी स्पर्धा करते. CB350 बाईकची एक्स शोरूम किंमत 2,09,558 रुपये आहे तर रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईकची एक्स शोरूम किंमत 1,93,080 रुपये आहे.

CB350 vs Classic 350 हार्डवेअर आणि ब्रेकिंग

रॉयल एनफिल्ड Classic 350 बाईकमध्ये समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस ट्विन शॉक शोषक सस्पेन्शन देण्यात आले आहे. समोर 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्क ब्रेक बाईकमध्ये देण्यात आला आहे.

Honda CB 350 बाईकमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन युनिट आणि मागील बाजूस नायट्रोजन शॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. तसेच बाईकला समोरील बाजूस 310mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240mm डिस्क ब्रेक दिला आहे.

CB350 vs Classic 350 इंजिन तपशील

होंडाकडून त्यांच्या नवीन बाईकमध्ये CB350 आणि CB350RS या दोन बाईकप्रमाणेच CB350 बाईकमध्ये 348.36 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 21 HP पॉवर आणि 29 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

तसेच रॉयल एनफिल्ड बाईक निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या सर्वच बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन देत आहे. Classic 350 या बाईकमध्ये रॉयल एनफिल्डकडून 349 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले आहे जे 20.2 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.