Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Celerio Waiting Period : 35.60 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 5 लाख! मारुतीच्या Celerio कारवर मिळतेय 64000 बंपर सूट, करावी लागेल इतकी प्रतीक्षा

मारुती सुझुकीकडून या महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या अनेक कारवर मोठी सूट दिली जात आहे. तसेच Celerio कारवर 64000 बंपर सूट देण्यात आली आहे.

0

Celerio Waiting Period : मारुती सुझुकी भारतीय ऑटो बाजारतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या सर्वच कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता मारुतीच्या काही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मारुती सुझुकीची Celerio ही हॅचबॅक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही कार सर्वाधिक मायलेज आणि कमी किमतीसाठी ओळखली जाते.

मारुती सुझुकी Celerio कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय ऑफर करण्यात येत आहे. ही कार पेट्रोल मोडमध्ये 26.68 Kmpl मायलेज देते तर सीएनजी व्हर्जनमध्ये 35.60 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीकडून या महिन्यात कारवर 64000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

एक्सचेंज, कॉर्पोरेट सवलत

मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय Celerio कारवर ३० सप्टेंबरपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. कारवर 40,000 रुपयांपर्यंतची रोख, 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज आणि 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

प्रतीक्षा कालावधी

मारुती सुझुकी Celerio कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळा प्रतीक्षा कालावधी आहे. ही कार खरेदीसाठी 3 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या डिलरशिपला भेट देऊ शकता.

इंजिन

Celerio कारमध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६६ एचपी पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

कारमध्ये रेडियंट फ्रंट ग्रिल, शार्प हेडलाइट युनिट आणि फॉग लाईट केसिंग, नवीन डिझाइनसह 15 इंच अलॉय व्हील, मागील बाजूस त्यास वक्र टेलगेट देण्यात आले आहे. फर्स्ट-इन-सेगमेंट हिल होल्ड असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, केंद्र-केंद्रित व्हिज्युअल अपील, क्रोम अॅक्सेंटसह ट्विन-स्लॉट एसी व्हेंट्स, नवीन गियर शिफ्ट, 7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.