Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 6 Airbags Cars : मारुती Fronx ते ह्युंदाई Verna पर्यंतच्या या कारमध्ये मिळतात 6 एअरबॅग्स आणि उत्कृष्ट फीचर्स! किंमत 6 लाखांपासून सुरु

तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी 6 एअरबॅग्स असलेली स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या कारमध्ये 6 एअरबॅग्स पर्याय ऑफर करण्यात येत आहे.

0

Cheapest 6 Airbags Cars : देशात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातामध्ये शेकडो नागरिकांचे जीव जात आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून सुरक्षित कार सादर केल्या जात आहेत. कारमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जात आहेत. ऑटो बाजारात ६ एअरबॅग्स असलेल्या अनेक कार उपलब्ध आहेत.

तुम्हाला सुरक्षित ६ एअरबॅग्स असलेली कार खरेदी करायची असेल मारुती सुझुकीपासून ते ह्युंदाईपर्यंतच्या अनेक कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स पर्याय दिला जात आहे. तसेच कारच्या किमती देखील कमी आहेत.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई मोटर्सकडून नुकतीच त्यांची Exter एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये कंपनीकडून सहा एअरबॅग ऑफर करण्यात आल्या आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत १०.१० लाख रुपये आहे.

Hyundai i-20

ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांची i-20 हॅचबॅक कारचे नवीन मॉडेल सादर केले आहे. या कारमध्ये देखील ६ एअरबॅग दिल्या आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे. त्यामुळे तुम्ही देखील अगदी कमी बजेटमध्ये ६ ऐरबॅग्स असलेली हॅचबॅक कार खरेदी करू शकता.

ह्युंदाई Verna

ह्युंदाईच्या Verna सेडान कारमध्ये देखील ६ एअरबॅग्स पर्याय दिला जात आहे. मार्च 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये सर्वाधिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 17.38 लाख रुपये आहे.

मारुती Fronx

मारुती सुझुकी Fronx कारमध्ये देखील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये मारुतीकडून ६ एअरबॅग्स पर्याय ऑफर केला आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.47 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.14 लाख रुपये आहे.

टोयोटा ग्लान्झा

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या ग्लान्झा हॅचबॅक कारमध्ये देखील ६ एअरबॅग्स पर्याय देण्यात आला आहे. या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात येत आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.71 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.