Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 7 Seater Car : दिवाळीचा आनंद करा दुप्पट! अवघ्या ६ लाखांत घरी आणा Innova ला टक्कर देणारी स्टायलिश फॅमिली कार

तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर ऑटो मार्केटमध्ये ७ लाखांपेक्षा कमी किमतीत शानदार कार उपलब्ध आहे. या ७ सीटर कारमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Cheapest 7 Seater Car : आजकाल अनेकजण मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करत असताना ७ किंवा ८ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. मात्र या कार खरेदी करताना अनेकांना कमी अबजेट ७ सीटर कार हवी असते. मात्र कार खरेदी करताना ग्राहक गोंधळात पडतात.

तुमचेही बजेट ७ लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी Renault Triber ७ सीटर कार उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत ७ लाखांपेक्षा कमी आहे.

आताही तुम्हालाही मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर फॅमिली कार खरेदी करण्यासाठी १० ते १२ लाख रुपये खरेदी करण्याची गरज नाही. Renault Triber ७ सीटर कार तुमच्यासाठी फायदेशीर कार आहे.

Renault Triber देशातील सर्वात स्वस्त आणि परवडणारी ७ सीटर कार आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.3 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आहे. RXE, RXL, RXT आणि RXZ या चार व्हेरियंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे मात्र मागील सीट काढल्यानांतर 625 लीटरपर्यंत बूट स्पेस वाढवता येते.

Renault Triber वैशिष्ट्ये

Renault Triber कारमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या ७ सीटर कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स आणि मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सेंटर कन्सोलमध्ये कूल्ड स्टोरेज आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय चार एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर-व्ह्यू कॅमेराही देण्यात आला आहे. या कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

Renault Triber इंजिन

Renault Triber कारमध्ये 1-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 72 bhp ची कमाल पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. 20 Kmpl मायलेज देणारी ही कार कमी बजेटमध्ये उत्तम ७ सीटर कार पर्याय आहे.