Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 7 Seater Cars : कुटुंबासोबत घ्या सहलीचा आनंद! मारुती, किआ आणि महिंद्राच्या ७ सीटर कार आहेत उत्तम पर्याय, किंमत फक्त…

नवीन ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती, किआ आणि महिंद्राच्या ७ सीटर कार कमी बजेटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

0

Cheapest 7 Seater Cars : नवीन कार खरेदी करत असताना प्रत्येकजण कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार कार निवडत असतो. काही जण ५ सीटरचा पर्याय निवडतात तर काही जण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ५ आणि ७ सीटर कार उपलब्ध आहेत.

मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडतात. तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात मारुती, किआ आणि Renault कंपनीच्या स्वस्त ७ सीटर कार बाजारात उपलब्ध आहेत.

Reanult Triber

Reanult कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Triber ७ सीटर कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी Triber ७ सीटर कार उत्तम पर्याय आहे.

Triber कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे जे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही कार सध्या बाजारात एकूण ५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. कमी बजेटमध्ये मारुतीची एर्टिगा ७ सीटर कार बाजारात उपलब्ध आहे.

या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे. मारुतीने एर्टिगा कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कारच्या सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किआ Carnes

किआ कार उत्पादक कंपनीची Carens ७ सीटर कार कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.45 लाख रुपये आहे. ही कार ७ व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा कार कंपनीने त्यांच्या अनेक शक्तिशाली ७ सीटर कार भारतीय ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिंद्राची ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात बोलेरो कारचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

महिंद्रा बोलेरो कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.80 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.81 लाख रुपये आहे. दरमहा या कारची ८ ते १० हजार युनिट्सची विक्री होते.