Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी या आहेत ३ सर्वात स्वस्त आणि जबरदस्त ७ सीटर कार्स, किंमत फक्त 9 लाख रुपयांपासून सुरु

तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती ते महिंद्रापर्यंतच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत.

0

Cheapest 7 Seater Cars : देशातील ऑटो बाजारात ७ सीटर कार मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. मारुती सुझुकीपासून महिंद्रापर्यंतच्या अनेक ७ सीटर कार बाजारात उपलब्ध आहेत.

खालील ७ सीटर कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत

रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट कार उत्पादक कंपनीची ट्रायबर ही ७ सीटर कार सर्वात स्वस्त MPV कार आहे. Triber ७ सीटर कारमध्ये 999cc 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6250 Rpm वर 71 Hp पॉवर आणि 3500 Rpm वर 96 Nm टॉर्क जनरेट करते.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.69 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.32 लाख रुपये आहे. ट्रायबरच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. ट्रायबर ७ सीटर कार 18-19 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वाधीक लोकप्रिय ७ सीटर कार आहे. या कारमध्ये 1.5-लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये काही नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. Ertiga कार सीएनजी आणि पेट्रोल पर्यायांमध्ये ऑफर करण्यात येत आहे.

ही कार MT व्हेरियंटमध्ये 20.51 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. Ertiga AT व्हेरियंट 20.3 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर Ertiga सीएनजी व्हेरियंट 26.11 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.79 लाख रुपये आहे.

महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो निओ ही कार देखील तुमच्यासाठी ७ सीटर कार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. कारमध्ये 1.5-लिटर mHawk डिझेल पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 100ps चा पॉवर आणि 160nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय या कारमध्ये देण्यात आला आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.78 लाख रुपये आहे.