Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 7 seater cars In India : 27km मायलेज आणि भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या या आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार! किंमत 5.22 लाखांपासून सुरू

तुम्हीही बाजारात ७ सीटर कार खरेदी करण्यासाठी शोधत असाल तर तुमच्यासाठी भारतात 27km मायलेज देणाऱ्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. त्यांची किंमत देखील कमी आहे.

0

Cheapest 7 seater cars In India : भारतीय ऑटो क्षेत्रासाठी जुलै महिना खास ठरत आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक कंपन्यांकडून नवीन कार आणि बाईक सादर केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना नवीन कार आणि बाईकचा पर्याय मिळत आहे.

आजकाल अनेकांना त्यांच्या मोठ्या कुटुंबासाठी कॉम्पॅक्ट एमपीव्ही कार खरेदी करायची आहे. त्यामुळे ते बाजारात मोठी स्पेस असणारी कार शोधत आहेत. भारतीय ऑटो क्षेत्रात अशा मोठ्या स्पेस असणाऱ्या ७ सीटर कार देखील उपलब्ध आहेत. खालील कार मोठ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकी कंपनीची Eeco कार तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या कारची एक्स शोरूम किंमत देखील 5.22 लाख रुपये आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे ही कार खरेदी करू शकतात.

मारुतीची Eeco कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 20.20 km मायलेज देते. तसेच सीएनजी व्हर्जनमध्ये 27.05 km/kg मायलेज देते. जे ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

या कारमध्ये कंपनीकडून .2L Advanced K-Series Dual Jet, Dual VVT इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते. ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, स्लाइडिंग दरवाजे, इमोबिलायझर, इल्युमिनेटेड हॅझर्ड स्विच, चाइल्ड लॉक आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यासारखी वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आली आहेत.

रेनॉल्ट ट्रायबर

तुम्हीही ७ सीटर कार शोधत असाल तर तुमच्यासाठी बाजारात रेनॉल्ट ट्रायबर ही कार उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार 20 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

रेनॉल्ट ट्रायबर कारमध्ये 1000 cc पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात येत आहे.

कारमध्ये एसी व्हेंट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.

किआ Carens

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी किआकडून भारतामध्ये ग्राहकांना ७ सीटर कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारचे Kia Carens असे नाव आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.60 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार 21Kmpl पर्यँतब मायलेज देते.

या कारमध्ये कंपनीकडून martstream 1.5 पेट्रोल, Smartstream 1.4 T-GDi पेट्रोल आणि 1.5 CRDi VGT डिझेल इंजिन देण्यात येत आहे. स्पोर्टी लूक आणि जबरदस्त केबिन स्पेससह अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज असलेली ७ सीटर कार तुमच्यासाठीबा बेस्ट पर्याय आहे.