Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest 7-Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी सर्वोत्तम आहेत टोयोटा ते महिंद्राच्या या 7 सीटर कार्स, पहा यादी

मोठ्या फॅमिलीसाठी स्वस्त ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर बाजारात महिंद्रा ते मारुतीच्या कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Cheapest 7-Seater Cars : मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. तुम्हालाही कटुंबासोबत एकत्रित प्रवासाचा आनंद घेईचा असेल तर तुमच्यासाठी बाजारात टोयोटा ते महिंद्रापर्यंतच्या कार उपलब्ध आहे.

सध्या बाजारात फॅमिली कारच्या मागणीत वाढ होत असताना अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन ७ किंवा ६ सीटर कार सादर करत आहेत. तुम्हीही कुटुंबासाठी 7 सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची एर्टिगा ७ सीटर कार ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या कारमध्ये आरामात ७ प्रवाशी प्रवास करू शकतात.

ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 20.51 kmpl आणि सीएनजी व्हेरियंट 26.11 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपयांपासून सुरु होते.

टोयोटा Rumion

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Rumion ७ सीटर कार सादर केली आहे. ही कार मारुती एर्टिगावर आधारित आहे. या कारमध्ये देखील ७ लोक आरामात प्रवास करू शकतात. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे. या कारमध्ये देखील पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

Kia Carens

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Carens ७ सीटर कार तुमच्यासाठी उत्तम फॅमिली कारचा पर्याय आहे. कारची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरु होते. कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो निओ कार तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी सर्वोत्तम कार आहे. कारमध्ये आरामात ७ लोक प्रवास करू शकतात. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.64 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.15 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट कार उत्पादक कंपनीची ट्रायबर ७ सीटर कार देखील तुमच्यासाठी उत्तम फॅमिली कारचा पर्याय आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरु होते. कारमध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.