Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest ADAS Car In India : कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी आहे? तर खरेदी करा ADAS फीचर्सने सुसज्ज असलेल्या या कार्स, जाणून घ्या ADAS म्हणजे काय?

तुम्हालाही सुरक्षित कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या कार सर्वोत्तम आहेत. ADAS हे एक नवीन तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा वैशिष्ट्ये आहे.

0

Cheapest ADAS Car In India : देशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांचा जीव जात आहे. मात्र तुम्हालाही तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर ADAS फीचर्सने सुसज्ज असलेल्या कार खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.

ADAS फीचर्सने सुसज्ज असलेल्या कार सर्वाधिक सुरक्षित कार मानल्या जातात. कारण अशा कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिलेले असतात. ऑटो मार्केटमध्ये काही ADAS फीचर्सने सुसज्ज असलेल्या कार अगदी कमी किमतीत उपलब्ध आहेत.

होंडा सिटी

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सिटी या लोकप्रिय सेडान कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. कारच्या V व्हेरियंटपासून ADAS सुरक्षा दिले जात आहे. कारची एक्स शोरूम किंमत 12.51 लाख रुपयांपासून सुरु होते. कारमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन किप असिस्ट आणि कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टिम असे फीचर्स दिले आहेत.

MG Astor

MG Astor या एसयूव्ही कारमध्ये देखील सुरक्षेच्या दुष्टीकोनातून लेव्हल 2 ADAS प्रणाली वापरण्यात आली आहे. MG हे देशात विकल्या जाणार्‍या सर्वात स्वस्त ADAS फीचर सुसज्ज कारपैकी एक आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 15 लाख 78 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई Venue

ह्युंदाई मोटर्सकडून ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत Venue कारच्या नवीन मॉडेलमध्ये SmartSense ADAS लेव्हल 1 सुरक्षा तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कारच्या SX (O) व्हेरियंटपासून ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जात आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.35 लाख रुपये आहे. ही SUV लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट आणि लेन फॉलो असिस्ट वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.

ADAS म्हणजे काय?

नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक कार सादर केल्या जात आहेत. आता अनके कंपन्यांकडून कारमध्ये ADAS वैशिष्ट्ये दिले जात आहे. ADAS हे एक जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहे. ADAS म्हणजे Advanced Driver Assistant System. ही एक अशी प्रणाली आहे जी कार चालवणे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवते.