Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest ADAS Cars In India : मस्तच… आता अपघाताची चिंता तर सोडाच! या 5 स्वस्त कार करतील स्वतःच ड्रायव्हिंग, मिळतात हे सुरक्षा फीचर्स

ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नवीन कार खरेदी करायची असेल तर देशातील ऑटो बाजारात कमी बजेटमध्ये काही उपलब्ध आहेत. ह्युंदाईपासून किआपर्यंतच्या कारचा यामध्ये समावेश आहे.

0

Cheapest ADAS Cars In India : देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) हे सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जात आहे. कंपन्यांकडून कारला सुरक्षित बनवण्यासाठी जास्तीत जास्त एअरबॅग्स दिल्या जात आहेत.

सध्या बाजारात अनेक ५ स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या कार उपलब्ध आहेत. आता नवीन तंत्रज्ञानावर आधारित कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. हे सुरक्षा वैशिष्ट्ये कारचा अपघात होण्यसापासून वाचवते.

या सुरक्षा वैशिष्ट्यामध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सारखी वैशिष्ट्ये ADAS मध्ये उपलब्ध आहेत.

5 स्वस्त ADAS कार

Hyundai Venue

ह्युंदाई कंपनीकडून त्यांच्या Venue या स्वस्त आणि दमदार फीचर्स कारमध्ये देखील ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये दिले आहे. या कारचे एन लाइन या व्हेरियंटमध्ये हे फीचर्स दिले जाते. ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये मिळवणारी देशातील पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. ADAS वैशिष्ट्ये असलेल्या Venue कारची एक्स शोरूम किंमत 10.32 रुपये आहे.

Honda City

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या City सेडान कारमध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. कंपनीकडून या कारचे नुकतेच अपडेटेड मॉडेल सादर करण्यात आले आहे. होंडा City या कारच्या V, VX आणि ZX या व्हेरियंटमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 12.58 लाख रुपयांपासून सुरू होते.

Hyundai Verna

ह्युंदाई कंपनीच्या आणखी एका स्वस्त आणि स्टायलिश कार Verna मध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. Verna कारच्या SX (O) या व्हेरियंटमध्ये हे फीचर्स दिले जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख आहे.

MG Astor

MG Astor या कारमध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. कारच्या सॅव्ही व्हेरियंटमध्ये ADAS फीचर्स उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 17 लाख रुपयांपासून सुरू होते.

Kia Seltos Facelift

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Seltos Facelift एसयूव्ही कारमध्ये देखील ADAS वैशिष्ट्यांचा लाभ देण्यात आला आहे. किआची Seltos Facelift कार सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 19.79 लाख रुपये आहे.