Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest AMT Cars In India : टाटा ते मारुतीच्या या आहेत स्वस्तात मस्त ऑटोमॅटिक कार! १० लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात प्रीमियम फीचर्स

स्वस्त आणि शानदार फीचर्स असलेल्या अनेक कंपन्यांच्या ऑटोमॅटिक कार्स बाजारात उपलब्ध आहेत. टाटा आणि मारुतीच्या ऑटोमॅटिक कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

0

Cheapest AMT Cars In India : सध्या भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटोमॅटिक कार्स उपलब्ध आहेत. तसेच अशा कारच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. कमी बजेट ग्राहकांचा विचार करता टाटा आणि मारुतीकडून अनेक स्वस्त ऑटोमॅटिक कार्स भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत.

तुम्हालाही दररोज ट्रॅफिकमधून प्रवास करावा लागत असेल तर तुमच्यासाठी ऑटोमॅटिक कार उत्तम पर्याय आहे. कारण अशा कारला सतत गिअर बदलण्याचे टेन्शन नसते. गर्दीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक कार सहज चालवल्या जाऊ शकतात.

मारुती सुझुकी अल्टो K10 AMT

मारुती सुझुकी नेहमीच स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर करत असते. मारुतीची अल्टो K10 AMT कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.61 लाख ते 5.90 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देखील देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी S-Presso AMT

मारुती सुझुकीची S-Presso कार देखील लोकप्रिय कार आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.76 लाख ते 6.05 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

टाटा पंच AMT

टाटा मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही पंच कारमध्ये देखील ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. पंच कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील ऑफर करण्यात येत आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.50 लाख ते 10.10 लाख रुपये आहे.

टाटा टियागो AMT

टाटा मोटर्सची टियागो हॅचबॅक कारमध्ये देखील ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये 1.2 L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ६.९५ लाख ते ७.८० लाख रुपये आहे.