Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Car : 36 Kmpl मायलेज आणि उत्कृष्ट फीचर्स! 5 हजारांत घरी आणा ही शानदार कार, मिळतात प्रीमियम फीचर्स

तुम्हीही नवीन कार खरेदीचा विचार करताय आणि बजेट कमी आहे? तर टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही अवघ्या 5 हजारांत शानदार मायलेज देणारी कार घरी आणू शकता.

0

Cheapest Car : तुम्हालाही वारंवार बाहेर जाण्यासाठी बस किंवा इतर वाहनांचा वापर करावा लागत असेल तर तुम्ही अगदी कमी किमतीत शानदार फीचर्स कार खरेदी करू शकता. दरमहा 5 हजारांत तुम्ही उत्कृष्ट फीचर्स असलेली कार खरेदी करू शकता.

प्रत्येकाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असते मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना खरेदी करता येत नाही. पण आता अवघ्या ५ हजारांत तुम्ही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही कार 36 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकीची अल्टो K10 कार तुमच्यासाठी सर्वोत्तम कार पर्याय आहे. या कारची किंमत देखील खूपच कमी असल्याने तुम्ही ही कार सहज खरेदी करू शकता. कमी बजेट ग्राहकांसाठी या कारवर EMI पर्याय देखील दिला जात आहे.

अल्टो K10 कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये ऑफर करण्यात येते. ही एक बेस्ट सिटी कार आहे. ५ लोक या कारमधून सहज आरामात प्रवास करू शकतात. त्यामुळे तुम्हाला दररोजच्या प्रवासातही ही एक उत्तम कार आहे.

शक्तिशाली इंजिन

Alto K10 कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन पेट्रोलवर 65.71 bhp आणि CNG वर 55.92 bhp पॉवर जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये ही कार 28 किमी प्रति लीटर आणि सीएनजीमध्ये 36 किमी प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. कारमध्ये 214 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

उत्कृष्ट वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी अल्टो K10 कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम, दोन एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सेंट्रल लॉकिंग यांसारखी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. शानदार मायलेज देणारी कार म्हणून तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

हप्ता फक्त 5 हजार रुपये

Alto K10 ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.96 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही कार EMI वर खरेदी करू शकता. या कारच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 4,44,680 रुपये आहे. ऑन-रोड किमतीच्या 75 टक्के कर्ज घेतले आणि 1,46680 रुपये डाउन पेमेंट केले तर अगदी सहज ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

7 वर्षांसाठी 8 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुमचा हप्ता 4,751 रुपये असेल. 7 वर्षात तुमच्याकडून या कर्जावर 99,079 व्याज आकारले जाईल. त्यामुळे तुमचे अगदी काही रुपयांमध्ये ही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.