Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Car Under 7 Lakh : डिझायर ते पंचपर्यंत कमी बजेटमध्ये खरेदी करा या कार्स! किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी

तुम्हीही कमी बजेटमधील कार शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये ७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील कार देखील उपलब्ध आहेत.

0

Cheapest Car Under 7 Lakh : तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची आहे आणि तुमचे बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण भारतीय ऑटो बाजारात अशा अनेक कार आहेत ज्यांची किंमत ७ लाख रुपयांपेक्षा देखील कमी आहे.

कार खरेदीसाठी कमी बजेट असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आज तुम्हाला भारतातील ७ लाख रुपयांपेक्षा देखील कमी किंमत असणाऱ्या कारबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी डिझायर

तुमचेही बजेट कमी असेल आणि कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी कंपनीची डिझायर ही कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या महिन्यामध्ये डिझायर कारवर १० हजार रुपयांची ऑफर देखील देण्यात येत आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत 6.44 लाख रुपये ते 9.31 लाख रुपये आहे. ही कार ४ मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+. मिड-स्पेक VXi आणि ZXi ट्रिम्स अशी या कारची ४ मॉडेल उपलब्ध आहेत.

टाटा पंच

कमी बजेट असणाऱ्या कार खरेदीदारांसाठी टाटा पंच ही एक सर्वोत्तम कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये ते 9.52 लाख रुपये आहे. ही कार देखील ४ मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

या कारमध्ये 366 लीटर बूट स्पेस देण्यात येत आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच या कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक आणि क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील डिफॉगर, मागील पार्किंग सेन्सर्स, एक रियर-व्ह्यू कॅमेरा अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.

Nissan Magnite

तुम्हीही कमी बजेटमधील कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Nissan Magnite ही कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख ते 11.02 लाख रुपये आहे. या कारचे ५ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत.

या कारमध्ये तुम्हाला XE, XL, XV एक्झिक्युटिव्ह, XV आणि XV प्रीमियम असे 5 व्हेरिएंट मिळतील. या कारमध्ये तुम्हाला अनके रंग पर्याय मिळतील. पर्ल व्हाइट विथ ऑनिक्स ब्लॅक, टूमलाइन ब्राउन विथ ओनिक्स ब्लॅक, विविड ब्लू विथ स्टॉर्म व्हाइट, ब्लेड सिल्व्हर, फ्लेअर गार्नेट रेड, ऑनिक्स ब्लॅक, सँडस्टोन ब्राउन आणि स्टॉर्म व्हाइट असे रंग पाहायला मिळतील.

या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सात-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये 336 लिटरची बूट स्पेस देखील मिळत आहे.