Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

‘ह्या’ आहे देशातील 3 स्वस्तात मस्त कार्स! फोटो पाहून वाटेल आश्चर्य | Cheapest Cars In India

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी कार अगदी कमी किमतीमध्ये सहज खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

0

Cheapest Cars In India: जर तुम्ही कमी बजेटमध्ये सर्वात भारी फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी कार खरेदीसाठी शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आम्ही आज या लेखात खास तुमच्यासाठी देशातील 3 स्वस्तात मस्त कार्सची माहिती घेऊन आलो आहोत.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणारी कार अगदी कमी किमतीमध्ये सहज खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti Suzuki Alto K10

मारुती सुझुकी अल्टो K10 कार देशातील हॅचबॅक सेगमेंटमध्ये चांगलीच पसंतीस उतरली आहे. या कारमध्ये कंपनीने पॉवरफुल इंजिन दिले आहे, ज्याची क्षमता 24.9 किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देण्याची क्षमता आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने याला 3.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च केले आहे.

त्याचे सीएनजी व्हेरियंटही बाजारात उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे. बाजारात उत्तम मायलेज आणि बेस्ट फीचर्समुळे दरमहा या कारच्या हजारो युनिट्सची विक्री होताना दिसत आहे.

Maruti Suzuki S-Presso

तुम्ही एकदा हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एस-प्रेसो कारचाही विचार करू शकता. ही 5 सीटर फॅमिली कार आहे. ज्यामध्ये कंपनीने दमदार इंजिन दिले आहे. या कारमध्ये 25.3 kmpl चा मायलेज देण्याची क्षमता आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने याला 4.26 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च केले आहे. त्याचे सीएनजी व्हेरियंटही बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांना या कारमध्ये उत्तम स्पेस, भन्नाट मायलेज आणि जबरदस्त लूक देखील पाहायला मिळतो.

Renault Kwid

Renault Kwid ही कंपनीची बजेट कार आहे. ज्याची एक्स शोरुम किंमत 4 लाख 69 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीने पॉवरफुल इंजिन दिले आहे, ज्याची क्षमता 22 किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देण्याची क्षमता आहे.

ही कार आधुनिक फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जून 2023 मध्ये या कारवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Renault कंपनी बंपर डिस्काउंट ऑफर देखील देत आहे यामुळे तुम्हाला ही कार अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकते.