Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Cars In India : कार खरेदीसाठी बजेट कमी आहे… टेन्शन नाही! 5 लाख रुपयांच्या किमतीत खरेदी या परवडणाऱ्या कार्स

तुम्हालाही कमी बजेटमध्ये फॅमिलीसाठी कार खरेदी करायची असेल तर बाजारात ५ लाख रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमतीमध्ये कार उपलब्ध आहेत.

0

Cheapest Cars In India : आजकाल ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार कार्स उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने सर्वसामान्य नागरिक अशा कार खरेदी करू शकत नाहीत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्केटमध्ये 5 लाख रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमतीत काही कार्स उपलब्ध आहेत.

देशातील सर्वच ऑटो कंपन्यांकडून त्यांच्या कमी बजेट ग्राहकांचा विचार करता अनेक कार सादर केल्या आहेत. या कार मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहेत. कारच्या किमती जरी कमी असल्या तरी कारमध्ये शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे कारच्या किमती देखील वाढत चालल्या आहेत. पण अजूनही काही कारच्या किमती अगदी कमी असल्याने त्या खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी कंपनीची सेलेरियो कार तुमच्यासाठी उत्तम आहे. ही हॅचबॅक कार उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि दमदार मायलेज देण्यासाठी ओळखली जाते. कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 58.3 BHP पॉवर जनरेट करते.

कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि रियर पार्किंग सेन्सर, इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक तसेच चाइल्ड लॉकसह अनके वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही कार 6.72 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. ही कार सीएनजीवर 36 Kmpl तर पेट्रोलवर 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी अल्टो k10

मारुती सुझुकीची अल्टो k10 कार तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. तर सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.13 लाख रुपये आहे.

कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. कार सीएनजी व्हर्जनमध्ये 36 किमी प्रति किलो आणि पेट्रोलवर 26 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये दोन एअरबॅग, ABS, रियर पार्किंग सेन्सर, इन्फोटेनमेंट सिस्टीम फीचर्स देण्यात आले आहेत.

Hyundai Santro

ह्युंदाईची Santro कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारमध्ये 1.1 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.87 लाख रुपये आहे. कार सीएनजी मोडमध्ये 32 किमी प्रति किलो आणि पेट्रोलवर 28 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

Tata Tiago NRG

टाटा मोटर्सकडून देखील अगदी कमी बजेटमध्ये सुरक्षित कार सादर केल्या जात आहेत. टाटा मोटर्सची Tiago कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही कार सीएनजी मोडमध्ये 30 किमी प्रति किलो आणि पेट्रोलवर 25 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. कारच्या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.52 लाख रुपये आहे.