Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Cars With Six Airbags : कुटुंबाच्या सुरक्षेत करू नका कोणतीही तडजोड! खरेदी करा परवडणाऱ्या 6 एअरबॅगने सुसज्ज असलेल्या या कार्स

तुम्हीही बाजारात नवीन कार खरेदीसाठी गेल्यानंतर ६ एअरबॅग्स असलेल्या कारचा पर्याय शोधत असाल तर मारुती ते ह्युंदाईच्या १० लाखांपेक्षा कमी किमतीतील कार बाजारात उपलब्ध आहेत.

0

Cheapest Cars With Six Airbags : देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र अनेक कार उत्पादक कंपन्यांककडून त्यांच्या सर्वात सुरक्षित कार सादर केल्या

रस्ते अपघातात कारमधील प्रवाशांचा जीव वाचावा यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहक देखील नवीन कार खरेदी करताना त्यांच्या कुटुंबासाठी जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेल्या कारचा पर्याय निवडत आहेत.

अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या त्यांच्या कारमध्ये सध्या ६ एअरबॅग्स देत आहेत. तसेच ADAS सारखे फीचर्स देखील देण्यात येत असल्याने कार अधिक सुरक्षित बनली आहेत. बाजारात सुरक्षित कारच्या किमती जास्त आहेत मात्र काही कंपन्यांनी कमी बजेट ग्राहकांना अगदी कमी किमतीत अशा कार उपलब्ध करून दिल्या आहेत.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या बलेनो हॅचबॅक कारमध्ये देखील जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅगसह, ESP, ब्रेक असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, EBD सह ABS सारखी सुरक्षा फीचर्स दिली आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 8.26 लाख रुपये आहे.

Kia Carens

किया कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Carens ७ सीटर कार ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या कारची किंमत जरी कमी असली तरी कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले आहेत.

Carens कारमध्ये ब्रेक असिस्ट, हायलाइन TPMS, हिल-असिस्ट कंट्रोल आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक, रिअर पार्किंग सेन्सर, ISOXIF अँकरेज, EBD सह ABS, डाउनहिल ब्रेक कंट्रोल अशी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. कारमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 10.20 लाख रुपये आहे.

ह्युंदाई i20

ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ह्युंदाई मोटर्सच्या बेस मॉडेलपासून ते टॉप मॉडेलपर्यंतच्या कारमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात येणार आहेत. ह्युंदाई i20 कारमध्ये परिपूर्ण सुरक्षा फीचर्स दिले गेले आहेत.

ह्युंदाई i20 कारमध्ये मागील पार्किंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, हिल असिस्ट कंट्रोल, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हायलाइन TPMS, ESC, 6 एअरबॅग पर्याय देण्यात आला आहे. कारची एक्स शोरूम किंमत 9.59 लाख रुपये आहे.

Hyundai i20 N लाइन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या i20 N Line हॅचबॅक कारमध्ये देखील 6 एअरबॅग पर्याय दिला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 11.03 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये आकर्षक फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.