Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Compact SUV : Creta, Nexon आणि Seltos यापैकी कोणती SUV आहे बेस्ट पर्याय? जाणून घ्या सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम SUV कार…

भारतीय ऑटो बाजारात अनेक एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मात्र एसयूव्ही कार खरेदी करताना अनेकजण गोंधळात पडतात. तुम्ही देखील बाजारातील सर्वोत्तम एसयूव्ही कार खरेदी करू शकता.

0

Cheapest Compact SUV : देशात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु आहे. अनेक नवीन कार खरेदीदारांकडून एसयूव्ही कारचा पर्याय निवडला जात आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत.

तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी एसयूव्ही कार खरेदी करताना गोंधळात पडला असाल तर काळजी करू नका. तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये शानदार एसयूव्ही कार खरेदी करू शकता. मारुतीपासून टाटापर्यंतच्या अनेक एसयूव्ही कार उपलब्ध आहेत.

एसयूव्ही कार खरेदी करताना तुम्ही Creta, Nexon आणि Seltos या कार निवडल्या असतील आणि तुम्हाला कोणती कार बेस्ट आहे जाणून घेईचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Elevate शानदार एसयूव्ही बाजारात सादर केली आहे. या कारच्या बुकिंगला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या एसयूव्ही कारने बाजारातील इतर एसयूव्ही कारच्या अडचणीत वाढ केली आहे.

स्पर्धा कोणकोणत्या एसयूव्ही कारमध्ये आहे

सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, Tiagun, कुशाक या एसयूव्ही कारमध्ये तगडी स्पर्धा सुरु आहे. यातच आता टाटा नेक्सॉनच्या फेसलिफ्ट मॉडेलने बाजारात एन्ट्री करत आणखी स्पर्धा वाढवली आहे.

किंमत फरक

होंडा Elevate कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाख रुपयांपर्यंत जाते. किआ seltos कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपये, मारुती ग्रँड विटारा एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपये आहे.

टाटा Nexon फेसलिफ्ट कार देखील १० लाख रुपयांच्या कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कार

देशातील सर्वच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या शानदार एसयूव्ही कारच्या विक्रीचे ऑगस्ट २०२३ मधील अहवाल सादर केले आहेत. यामध्ये मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही कारचे सर्वाधिक युनिट्सविकली गेली आहेत. या कारची ऑगस्ट महिन्यात 14,572 युनिट्स विकली गेली आहेत. तर क्रेटा कारची 13,832 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती ग्रँड विटारा कारच्या 11,818 युनिट्सची विक्री झाली आहे.