Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Electric Cars : पेट्रोल-डिझेलचे टेन्शन नाही! या इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये देतात 456 किमी रेंज, पहा यादी

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार असेल तर ऑटो मार्केटमध्ये महिंद्रा ते टाटाच्या स्वस्त आणि दमदार ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत.

0

Cheapest Electric Cars : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकजण नवीन कार खरेदी करताना पेट्रोल आणि डिझेलवरील कार खरेदी करणे टाळत आहेत. तसेच इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्तम इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. या इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यावर तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची देखील गरज नाही. सिंगल चार्जवर या कार 456 किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहेत.

Tata Nexon EV

टाटा मोटर्सचे सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये चांगले वर्चस्व असल्याचे दिसत आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला टाटा मोटर्सची Nexon EV कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Nexon EV कारमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. 30.2kWh बॅटरी पॅक असलेली कार 312 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14.74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.94 लह रुपये आहे.

महिंद्रा XUV 400

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची एकमेव इलेक्ट्रिक कार XUV 400 बाजारात उपलब्ध आहे. येत्या काळात महिंद्रा त्यांच्या आणखी नवीन इलेक्ट्रिक कार देखील सादर करणार आहे. XUV 400 इलेक्ट्रिक कारमध्ये 39.4 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

ही कार सिंगल चार्जमध्ये 456 किमी धावू शकते. बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 50 मिनिटे लागतात. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.39 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर

टाटा मोटर्सची टिगोर EV कार देखील ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. टिगोर इलेक्ट्रिक कारमध्ये 26 kWh चा बॅटरी पॅक पर्याय देण्यात आला आहे. सिंगल चार्जवर ही कार 306 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरु होते तर 13.75 लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा टियागो

टाटा मोटर्सच्या टियागो कारमध्ये देखील इलेक्ट्रिक पर्याय देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 19.2 kWh आणि 24 kWh दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात आले आहेत. 19.2 kWh बॅटरी पॅक 250 किमी आणि 24 kWh बॅटरी पॅक 315 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरु होते.