Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Sunroof Cars : 7 लाख किंमत आणि लक्झरी फीचर्स! या आहेत देशातील सर्वात स्वस्त सनरूफ कार, क्रेटापासून ब्रेझापर्यंतच्या कारचा समावेश

कमी किमतीमध्ये शानदार फीचर्स असलेली सनरूफ कार खरेदी करायची असेल तर बाजारात ह्युंदाई क्रेटा ते मारुती ब्रेझापर्यंत अनेक कार उपलब्ध आहेत.

0

Cheapest Sunroof Cars : आजकाल नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण सनरूफ कार खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. तसेच सनरूफ कार खरेदी करण्याचा सध्या एक ट्रेंड सुरु आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

सनरूफ कार खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या किमती अधिक असल्याचे पाहायला मिळते. मात्र तुम्हालाही सनरूफ कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक स्वस्त सनरूफ कार उपलब्ध आहेत. तसेच या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स देण्यात येत आहेत.

Hyundai i20

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या i20 या लोकप्रिय कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स देण्यात आले आहे. या कारची Magna, Sportz, Asta आणि Asta (O) अशी व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. कारमध्ये पर्याय देण्यात आले आहेत.

1.2 L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, दुसरे 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि तिसरे 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. Hyundai i20 ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.07 लाख रुपये आहे तर तो मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.62 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह 20.28 kmpl आणि डिझेल इंजिनसह 25.0 kmpl मायलेज देते.

ह्युंदाई i20 कारमध्ये एअर प्युरिफायर, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, कनेक्टेड कार टेक आणि ऑटो एलईडी हेडलाइट्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच कारमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, रिअर पार्किंग आणि रिव्हर्स कॅमेरा असे मानक फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

मारुती ब्रेझा

मारुती सुझुकी ब्रेझा कार ही देशातील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. या कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.96 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Venue

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Venue कारमध्ये टन इंजिन पर्याय दिले जात आहेत. पहिले 1.2-लीटर पेट्रोल जे 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरे 1-लीटर टर्बो-पेट्रोल जे 120PS पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तिसरे 1.5-लीटर डिझेल जे 100PS पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये सनरूफ फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.53 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.72 लाख रुपये आहे.

ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाई मोटर्सच्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा कारमध्ये देखील सनरूफचे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे जे 115 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करते. 1.5-लीटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे जे 115PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.44 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.24 लाख रुपये आहे.