Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Sunroof Cars In India : कमी बजेटमध्ये खरेदी करा या स्वस्त सनरूफ कार! किंमत 6 लाखांपासून सुरु…

देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या सनरूफ फीचर्स कार उपलब्ध आहेत. मात्र किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाहीत. पण कमी बजेट सनरूफ कार देखील बाजारात उपलब्ध आहेत.

0

Cheapest Sunroof Cars In India : तुम्हालाही नवीन सनरूफ असलेली कार कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल तर बाजारात टाटा ते ह्युंदाई पर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील खूपच कमी असून कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत.

खालील स्वस्त कारमध्ये सनरूफ उपलब्ध आहे

ह्युंदाई Exter

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची स्वस्त आणि शानदार मायक्रो एसयूव्ही Exter अलीकडेच भारतात दाखल केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.15 लाख रुपये आहे. या कारमध्ये ग्राहकांना सनरूफ सारखे फीचर्स दिले जात आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सने देखील त्यांची सर्वात लहान एसयूव्ही पंच कर सादर केली आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. लवकरच या कारमध्ये इलेक्ट्रिक पर्याय देखील मिळू शकतो.

पंच कारमध्ये ग्राहकांना सनरूफ सारखे फीचर्स कमी बजेटमध्ये दिले जात आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटींग मिळाले आहे.

टाटा Altroz

टाटा मोटर्सने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक कार Altroz मध्ये देखील सनरूफ फीचर्स दिले आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे.

ह्युंदाई i20

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या नवीन i20 हॅचबॅक कारमध्ये सनरूफ सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहे. तुम्हीही ही कार कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.16 लाख रुपये आहे.

Mahindra XUV300

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या XUV300 एसयूव्ही कारमध्ये देखील सनरूफ फीचर्स दिले आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.76 लाख रुपये आहे.