Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest Sunroof SUV : अवघ्या 6 लाखांत खरेदी करा 6 एअरबॅगसह येणारी डॅशिंग सनरूफ SUV, देते 32 Kmpl मायलेज, पहा फीचर्स

तुम्हालाही सनरूफ असलेली कार कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ह्युंदाई मायक्रो एसयूव्ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत देखील ६ लाख रुपयांपासून सुरु होते.

0

Cheapest Sunroof SUV : देशातील ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांचा एसयूव्ही कार खरेदी करण्याकडे अधिक भर असल्याचे दिसत आहे. अशातच अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या शानदार एसयूव्ही कार सादर करत आहेत.

तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी ५ सीटर एसयूव्ही कार शोधत असाल तर कमी किमतीत जबरदस्त एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार सादर केल्या आहेत.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter सादर केली आहे. ही कार सादर केल्यापासून कारचे बुकिंग जोरदार सुरु आहे. या कारने टाटा पंचला चांगलीच टक्कर दिली आहे. तसेच आता मारुती Fronx कारला देखील मागे टाकण्यासाठी ही कार सज्ज आहे.

उत्कृष्ट मायलेज आणि दमदार फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. कमी किंमत असल्याने ग्राहकांचा देखील या मायक्रो एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारला हजारो बुकिंग मिळाले आहे.

ह्युंदाई Exter इंजिन

ह्युंदाई मोटर्सकडून Exter एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील सादर केली आहे. कारचे बुकिंग जास्त असल्याने कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ झाली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ८ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

6 एअरबॅगची सुरक्षा

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या Exter एसयूव्ही कारमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक फीचर्स दिले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग्जचे सेफ्टी फीचर स्टँडर्ड म्हणून दिलेले आहे. मात्र मारुतीच्या फ्रॉन्क्स एसयूव्ही कारमध्ये २ एअरबॅग्ज दिल्या आहेत.

TPMS देखील उपलब्ध

ह्युंदाई Exter कारमध्ये TPMS चे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. टीपीएमएस म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ती तुम्हाला कारच्या टायरमधील हवेच्या दाबाविषयी माहिती देत ​​असते. तसेच कारमध्ये 8 इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, 6 स्पीकर देण्यात आले आहेत.

शानदार मायलेज

ह्युंदाई मोटर्सकडून अगदी कमी किमतीमध्ये शानदार कार सादर केली आहे. ह्युंदाई Exter कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 26 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजीमध्ये ३२ कम्प्लमायलेज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला इंधनावर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

किंमत देखील कमी

ह्युंदाई मोटर्सने कमी बजेट ग्राहकांना अगदी कमी किमतीत Exter एसयूव्ही कार उपलब्ध करून दिली आहे. Exter कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.