Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cheapest SUV In India : बजेट कमी आहे टेन्शन नाही… अवघ्या 6 लाखात घरी आणा 5 स्टार सेफ्टी रेटिंग SUV

कमी बजेट आहे आणि एसयूव्ही कार खरेदी करण्याची स्वप्न असेल तर ते सहज पूर्ण होऊ शकते. कारण टाटा मोटर्सची ६ लाखांच्या बजेटमधील एसयूव्ही कार तुम्ही खरेदी करू शकता.

0

Cheapest SUV In India : भारतीय कार मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. नवीन कार खरेदी करत असताना ग्राहक एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे एसयूव्हीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांच्या शानदार एसयूव्ही कार ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या एसयूव्ही कारच्या किमती देखील जास्त असल्याने अनेकांना एसयूव्ही कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अनेक कार कंपन्या त्यांच्या स्वस्त एसयूव्ही कार सादर करत आहेत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये जबरदस्त एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कार उपलब्ध आहे. ही कार सर्वाधिक एसयूव्ही कार आहे. या कारला क्रश चाचणीमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

तुमचे बजेट ६ ते ८ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही पंच एसयूव्ही कार अगदी सहज खरेदी करू शकता. पंच एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच कारमध्ये जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

कमी बजेटमध्येही जबरदस्त सुरक्षा

पंच एसयूव्ही कारची किंमत जर कमी असली तरी कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. G NCAP चाचणीमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. तसेच लवकरच पंच एसयूव्ही कारमध्ये इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील पाहायला मिळेल.

टाटा पंच इंजिन

टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात लहान एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 88 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 20.09 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हेरियंट 26.99 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा पंच वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने त्यांच्या पंच एसयुव्ही कारमध्ये कमी बजेटमध्ये दमदार वैशिष्ट्ये दिली आहेत. कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

पंच कारमध्ये 366 लीटरची बूट स्पेस दिली आहे. तसेच कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर असे फीचर्स दिले गेले आहेत.

पंच किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.52 लाख रुपये आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी पंच एसयूव्ही कार उत्तम पर्याय आहे.