Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : Creta, Seltos ची बत्ती गुल! या स्वस्त ७ सीटर SUV कारचे बुकिंग सुरु, मिळणार आकर्षक फीचर्स, किंमतही खूपच कमी

भारतीय ऑटो बाजारात आणखी एक ७ सीटर एसयूव्ही कार सादर करण्यात अली आहे. या कारचे बुकिंग आजपासून सुरु करण्यात आले आहे. तुम्ही देखील तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी या कारचा पर्याय निवडू शकता.

0

Citroen C3 Aircross : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उपलब्ध आहेत. मात्र आणखी नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आणखी एका ७ सीटर एसयूव्ही कारचे बुकिंग सुरु झाले आहे.

भारतीय ऑटो बाजारात फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroen ने त्यांची शानदार ५ आणि ७ सीटर एसयूव्ही कार C3 Aircross लॉन्च केली आहे. आता या कारचे बुकिंग देखील सुरु झाल्याने Creta आणि Seltos च्या अडचणीत वाढ झाली आहे.

15 ऑक्टोबरपासून डिलीव्हरी सुरू होईल

Citroen च्या नवीन C3 Aircross एसयूव्ही कारची डिलिव्हरी लवकरच सुरु केली जाणार आहे. 15 ऑक्टोबरपासून ही कार ग्राहकांना डिलिव्हर केली जाणार आहे. कारमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 110 PS पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

फक्त 25 हजार रुपये भरून बुकिंग करा

तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी शानदार ७ सीटर एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी C3 Aircross ही एक सर्वोत्तम कार आहे. ही कार तुम्ही 25 हजार रुपये भरून बुक करू शकता. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलच एक्स शोरूम किंमत 12.10 लाख रुपये आहे. ही कार तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

मायलेज 18.5 kmpl

C3 Aircross ही फॅमिली कार सहा ड्युअल टोन आणि चार मोनोटोन रंग पर्यायांमध्ये सादर केली आहे. ही कार ५ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. ही कार 18.5 kmpl चा मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे.

हिल-होल्ड असिस्ट आणि मागील पार्किंग सेन्सर्स

C3 Aircross कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.2-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. कारच्या पुढील बाजूस, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल-होल्ड असिस्ट, मागील पार्किंग सेन्सर देखील देण्यात आला आहे. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असे फीचर्स देखील देण्यात आले आहे.