Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : Creta च्या अडचणीत होणार आणखी वाढ! फ्रेंच कंपनीची स्टायलिश एसयूव्ही भारतात होणार लॉन्च

ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार Creta च्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण सप्टेंबर २०२३ मध्ये आणखी एक शानदार एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात दाखल होणार आहे.

0

Citroen C3 Aircross : होंडा कंपनीकडून त्यांची शानदार आणि आकर्षक एसयूव्ही Elevate लॉन्च केल्यानंतर ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार Creta च्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र क्रेटाची अडचण इथेच थांबणार नाही तर आणखी एक स्टायलिश एसयूव्ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे.

फ्रेंच कार निर्माता Citroen आपली C3 Aircross ही शानदार एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. कंपनीकडून या कारचे बुकिंग सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही देखील 15 सप्टेंबरपासून या एसयूव्ही कारचे बुकिंग करू शकता.

Citroen कंपनीकडून त्यांची आगामी C3 Aircross SUV कार फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली जाऊ शकते. कारमध्ये कंपनीकडून 1.2 लीटर टर्बोचार्ज केलेले इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 108 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

C3 Aircross SUV कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. कंपनीकडून या कारमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. ही कार 18.5 Kmpl मायलेज देईल असा दावा करण्यात येत आहे.

SUV 7-सीटर असेल

Citroen कंपनीकडून C3 Aircross कारमध्ये 5 सीटर आणि 7 सीटर पर्याय दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार सीटिंग कॉन्फिगरेशन पर्यायनिवडू शकतात. कारमध्ये भरपूर जागा देण्यात येईल.

उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत

C3 Aircross आगामी एसयूव्ही कारमध्ये धमाकेदार वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. कारमध्ये 10.23-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि सिट्रोएन कनेक्ट असे फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे.

या आगामी एसयूव्ही कारमध्ये पर्सनल असिस्टंट आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्ससह 35 स्मार्ट कनेक्टेड फीचर्स असू शकते. तसेच कारमध्ये ABS-EBD, हिल होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर, रियर व्ह्यू कॅमेरा, हाय स्पीड अलर्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि सीटबेल्ट रिमाइंडर अशी सुरक्षा वैशिष्ट्ये असू शकतात.

किंमत

Citroen कार उत्पादक कंपनीची आगामी C3 Aircross एसयूव्ही कारची सुरुवातीची अपेक्षित एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये असू शकते.