Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : Ertiga च्या अडचणीत होणार वाढ! लवकरच लॉन्च होणार स्वस्तातील शानदार 7-सीटर कार, पहा फीचर्स आणि किंमत

भारतीय ऑटो बाजारात आणखी एक शानदार ७ सीटर कार लॉन्च होणार आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन दिले जाऊ शकते.

0

Citroen C3 Aircross : भारतीय ऑटो बाजारात ७ सीटर कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवीन शानदार आणि शक्तिशाली ७ सीटर कार लॉन्च केल्या जात आहेत. आता Ertiga च्या अडचणीत वाढ करण्यासाठी आणखी एक स्वस्त 7 सीटर कार लॉन्च होणार आहे.

फ्रेंच कार उत्पादक Citroen कार उत्पादक कंपनी त्यांची C3 Aircross ही ७ सीटर एसयूव्ही कार लवकरच भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करणार आहे. सध्या Citroen कडून त्यांची eC3 इलेक्ट्रिक कार बाजारात विकली जात आहे.

Citroen च्या नवीन C3 Aircross या एसयूव्ही कारचे बुकिंग या महिन्यात सुरु होणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला कंपनीकडून C3 Aircross एसयूव्ही कार लॉन्च केली जाऊ शकते. ही कार परिपूर्ण वैशिष्ट्यांनी सुसज्ज असू शकते. C3 हॅचबॅकपेक्षा अधिक प्रीमियम कार असेल.

सीएमपी आर्किटेक्चरवर आधारित

Citroen ची C3 Aircross ही एक माध्यम आकाराची एसयूव्ही असणार आहे. तामिळनाडूतील PSA प्लांटमध्ये कारची निर्मिती केली जाता आहे. कारच्या किमतीबद्दल कंपनीकडून अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र ग्राहकांना आकर्षित करणारी कारची किंमत असेल अशी अपेक्षा केली जात आहे.

5 आणि 7 सीटर लेआउट

Citroen C3 Aircross या एसयूव्ही कारमध्ये 2 लेआउट सादर केली जाणार आहे. कारमध्ये ग्राहकांना ५ सीटर आणि ७ सीटरचा पर्याय दिला जाऊ शकतो. कारमध्ये अधिक जागा पाहायला मिळू शकते.

Citroen C3 Aircross किंमत

Citroen C3 Aircross या एसयूव्ही कारचे बुकिंग सप्टेंबर २०२३ मध्ये सुरु होणार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9 लाख ते 14 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार बाजारात लॉन्च होताच Maruti Ertiga, Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, MG Astor, Maruti Suzuki Grand Vitara आणि Honda Elevate यांच्याशी स्पर्धा करेल.

Citroen C3 Aircross इंजिन

C3 Aircross या एसयूव्हीमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 170 Nm टॉर्क आणि 110 hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असणार आहे.