Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : आता एर्टिगासाठी प्रतीक्षा करणे विसरा! बाजारात आली ही जबरदस्त 7 सीटर SUV, पहा किंमत आणि फीचर्स

एर्टिगा कार खरेदीसाठी ग्राहकांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र आता या ७ सीटर कारला टक्कर देण्यासाठी बाजारात नवीन 7 सीटर SUV दाखल झाली आहे.

0

Citroen C3 Aircross : मारुती सुझुकी एर्टिगा कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एर्टिगा ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता मारुती सुझुकी एर्टिगा कारला टक्कर देण्यासाठी बाजारात आणखी जबरदस्त एसयूव्ही दाखल झाली आहे.

मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करण्यासाठी अनेकजण मारुती सुझुकी कारचा पर्याय निवडत आहेत. मात्र आता ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्ही या कारऐवजी Citroen C3 Aircross ही एसयूव्ही कार खरेदी करू शकता.

Citroen C3 Aircross एसयूव्ही कारमध्ये ५ आणि ७ सीटर पर्याय देण्यात येत आहे. ही कार ऑटो बाजारात Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Toyota Rumion आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या Honda Elevate शी स्पर्धा करू शकते.

C3 एअरक्रॉसमध्ये काय खास आहे?

C3 Aircross या एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.10 लाख रुपये आहे. ही कार ३ व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

C3 Aircross SUV इंजिन

बाजारात दाखल झालेल्या नवीन C3 Aircross एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 110 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये लॉन्च केली आहे. C3 Aircross एसयूव्ही 18.5 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

वैशिष्ट्ये

Citroen C3 Aircross एसयूव्ही कारमध्ये 10.2-इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.

कारमध्ये स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स आणि मॅन्युअल एसी, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल-होल्ड असिस्ट, मागील पार्किंग सेन्सर, रिव्हर्स कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देखील देण्यात आले आहे.