Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : मोठ्या फॅमिलीसाठी कार शोधताय? तर ही शक्तिशाली इंजिनसह येणारी 7 सीटर आहे बेस्ट पर्याय, पहा लक्झरी फीचर्स आणि किंमत

ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून नवनवीन ७ सीटर कार सादर केल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्या फॅमिलीसाठी ग्राहकांना अनेक ७ सीटर कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

0

Citroen C3 Aircross : मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करत असताना अनेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या ७ सीटर कार शोधत असतात. भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणती ७ सीटर कार त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे हे समजत नसते.

फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने भारतीय बाजारात त्यांची C3 Aircross SUV कार सादर केली आहे. या कारला ५ आणि ७ सीटर पर्याय देण्यात आले आहेत. तुम्हालाही ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

C3 Aircross SUV कारचे बुकिंग सुरु झाले आहे. तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 25 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर ही कार खरेदी करू शकता. लवकरच या कारची डिलिव्हरी देखील सुरु होणार आहे.

Citroen कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या C3 Aircross एसयूव्ही कारच्या किमती जाहीर केल्या आहेत. C3 Aircross या कारच्या U बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

क्रेटा पेक्षा लांब व्हीलबेस

CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर C3 Aircross ही कार तयार करण्यात आली आहे. या एसयूव्ही कारचा व्हीलबेस 2,671mm देण्यात आला आहे. कारमध्ये सिग्नेचर ग्रिल, लाँग फ्रंट बंपर, ड्युअल लेयर डिझाईन, पियानो ब्लॅक इन्सर्ट, हॅलोजन हेडलॅम्प, वाय शेप डीआरएल, एक्स शेप डिझाइन तसेच 17 इंच अलॉय व्हील आणि प्रशस्त टेलगेट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच कारमध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेदरेट अपहोल्स्ट्री, कीलेस एंट्री, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत.

मोठी बूट स्पेस

C3 Aircross कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 109 bhp ची कमाल पॉवर आणि 190 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय ऑफर करण्यात आला आहे. ५ सीटर C3 Aircross कारमध्ये 511 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे तर ७ सीटर C3 Aircross कारमध्ये 444 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.