Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross : शक्तिशाली इंजिन आणि धमाकेदार फीचर्स! 10 लाखांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झाली शानदार 7 सीटर कार, पहा मायलेज

भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी एक ७ सीटर कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ही कार उत्तम ठरू शकते.

0

Citroen C3 Aircross : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहेत. मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडतात. आता बाजारात आणखी एक शानदार ७ सीटर कार लॉन्च झाली आहे.

Citroen कार उत्पादक कंपनीने भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी एक कार लॉन्च केली आहे. C3 Aircross असे या एसयूव्ही कारचे नाव आहे. ही एक मिडसाईझ एसयूव्ही आहे. या कारमध्ये ग्राहकांना ५ सीटर आणि ७ सीटर पर्याय देण्यात आला आहे.

Citroen C3 Aircross

C3 Aircross एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रूपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15 लाख रुपये आहे. तुम्हीही ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी C3 Aircross एसयूव्हीचा पर्याय उपलब्ध झाला आहे .

ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या कारचे बुकिंग करावे लागणार आहे. जवळच्या डिलरशिपकडे जाऊन तुम्ही ही कार बुकिंग करू शकता. 25,000 रुपये टोकन रक्कम भरून कार बुकिंग केली जात आहे. या कारची डिलिव्हरी 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

डिझाइन आणि डायमेंशन

Citroen C3 Aircross ही एसयूव्ही कार सी-क्यूब प्लॅटफॉर्मवर बनवलेली भारतातील कंपनीची दुसरी कार आहे. या कारची लांबी 4300 मिमी, रुंदी 1796 मिमी, उंची 1654 मिमी आहे. तसेच 2671 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे. या कारच्या ५ सीटर पर्यायांमध्ये 511 लीटर आणि ७ सीटर पर्यायांमध्ये 444 बूट स्पेस देण्यात आली आहे.

इंटेरियर आणि वैशिष्ट्ये

कारमध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच 10.2-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, रियर-व्ह्यू कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

इंजिन

C3 Aircross एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 110PS ची पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही कार 18.5 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.