Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C3 Aircross Vs Kia Carens कोणती फॅमिली कार आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम! पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

स्वस्त फॅमिली कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Citroen C3 Aircross आणि Carens एसयूव्ही कार उत्तम पर्याय आहेत. मात्र त्याआधी तुम्हाला कोणती कार स्वस्त आणि बेस्ट आहे हे जाणून घेईला लागेल.

0

Citroen C3 Aircross Vs Kia Carens : तुम्हालाही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर देशातील ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. Kia Carens आणि Citroen C3 Aircross या MPV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Citroen C3 Aircross Vs Kia Carens डायमेंशन

Citroen C3 Aircross कारची लांबी 4300 मिमी, रुंदी 1796 मिमी आणि व्हीलबेस 2671 मिमी देण्यात आला आहे. तर Kia Carens कारची लांबी 4540 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि व्हीलबेस 2780 मिमी देण्यात आला आहे.

C3 Aircross Vs Kia Carens वैशिष्ट्ये तुलना

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Carens या ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये शानदार फीचर्स दिले आहेत. मानक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन, हवेशीर जागा, 8-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञानसह 6 एअरबॅग्स दिल्या आहेत.

तसेच C3 Aircross या ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये 10.2 इंच टचस्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रियर कॅमेरा, ड्युअल एअरबॅग्ज अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

इंजिन

C3 एअरक्रॉस एसयूव्ही कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. C3 एअरक्रॉस एसयूव्ही कारचे इंजिन 110hp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तर किआ Carens या ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.5 लीटर पेट्रोल इंजिन जे 115 bhp पॉवरसह देण्यात आले आहे. दुसरे 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 160 bhp पॉवरसह दिले आहे आणि तिसरे 1.5 डिझेल इंजिन 116 bhp पॉवरसह देण्यात आले आहे.

C3 Aircross Vs Kia Carens किंमत

C3 Aircross आणि Kia Carens या दोन्ही ७ सीटर कार तुमच्या फॅमिलीसाठी स्वस्त फॅमिली कार आहे. या कारच्या किमती कमी आहेत. मात्र दोन्ही कारच्या इंजिन आणि फीचर्समध्ये बदल आहेत.

C3 एअरक्रॉस एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.3 लाख रुपये आहे. किआ Carens एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.4 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.45 लाख रुपये आहे.