Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen C5 Aircross खरेदीची सुवर्णसंधी! होणार 2 लाखांची बंपर बचत; जाणून घ्या ‘ही’ अप्रतिम ऑफर

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता हजारो रुपयांची बचत करून तुमच्यासाठी लोकप्रिय कार SUV C5 Aircross  घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही या एसयूव्ही कार खरेदीवर किती बचत करू शकणार आहे.

0

Citroen C5 Aircross:  भारतीय ऑटो बाजारात सध्या जुलै 2023 मध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त ऑफर जाहीर करण्यात येत आहे फायदा घेत तुमच्यासाठी अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एक शानदार कार घरी आणू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय ऑटो बाजारात  फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक Citroën ने एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे.

या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता हजारो रुपयांची बचत करून तुमच्यासाठी लोकप्रिय कार SUV C5 Aircross  घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही या एसयूव्ही कार खरेदीवर किती बचत करू शकणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतीय ऑटो बाजारात C5 Aircross उत्तम फीचर्स तसेच शक्तिशाली इंजिनसह उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत  37.17 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारपेठेत ही कार Hyundai Tucson, Jeep Compass, Skoda Kushaq आणि Volkswagen Tigun या कारशी स्पर्धा करते.

Citroen C5 Aircross  ऑफर

Citroën India त्‍याच्‍या फ्लॅगशिप क्रॉसओवर C5 Aircross वर रु. 2 लाखांपर्यंत बंपर सवलत देत आहे. ही ऑफर केवळ 31 जुलै 2023 पर्यंत वैध आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि 2022 नंतर उत्पादित केलेल्या मॉडेल्सवर लागू आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिप किंवा शोरूमला भेट देऊन जाणून घेऊ शकता.

Citroen C5 इंजिन आणि व्हेरियंट

Citroen C5 Aircross च्या व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर ते एकाच पूर्ण लोडेड शाइन व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास याला 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन मिळते, जे 174bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

नवीन SUV लवकरच लाँच होणार

भारतीय बाजारपेठेत ऑटोमेकर येत्या काही दिवसांत आपल्या अनेक कार लॉन्च करू शकते. Citroën ने अलीकडच्या काळात C3 Aircross सादर केले आहे. C3 ही देखील C5 Aircross आणि eC3 नंतर ब्रँडची चौथी SUV असेल.

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 10 ते 15 लाख रुपये असू शकते. लॉन्च झाल्यानंतर, ते Hyundai Creta, Grand Vitara, High Rider, Nexon आणि Seltos बरोबर स्पर्धा करेल.